Maharashtraसहकार घोटाळा

आर्वी तालुका कृषी उत्पन्न बाजार समीती उपकर चोरी प्रकरण, संचालक व अध्यक्षाच्या भांडणात कापुस व्यापारी येणार गोत्यात, चौकशी अधिकाऱ्यांनी व्यापाऱ्यांना जारी केले नोटीस,

दोन वर्षात सुमारे दोन कोटी रुपयाच्या उपकाराची चोरी, जर दस्ताऐवज पुरवले नाही तर होणार कडक कारवाई

     आर्वी,दि.१०:- तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गजानन निकम व सभापती संदिप काळे यांच्या भांडणात येथील कापुस व्यापारी गोत्यात येणार आहेत. चौकशी समीतीने त्यांना दोन वर्षात केलेल्या व्यवहाराची माहिती बंद लिफाफ्यामध्ये मागीतली असुन यातुन अनेक घोटाळे व लाखो रुपयाच्या उपकराची चोरी उघडकीस येण्याची शक्यता आहे.

तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये मोठ्या प्रमाणात उपकराची चोरी होत असल्याचा आरोप समितीचे संचालक गजानन निकम यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातुन लावला होता. आर्वी तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डवर गत अनेक वर्षा पासुन मालाच लिलाव होत नसल्याने व्यापारी परस्पर कापसाची खरेदी करुन त्यांच्याच काट्यावर मालाची तोलाई करतात. यातील तिस टक्के खरेदीची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीला देवुन ७० टक्के खरेदी वरील उपकर व तोलाईच्या रक्कमेची चोरी करतात. यात कृषी उत्पन्न बाजार समितीचे पदाधिकारी व मापारी यांचा  सुध्दा हिस्सा असतो असा आरोप आहे.

या आरोपाची चौकशी करण्याकरीता समिती गठीत करण्यात आली आहे. यात लेखापरिक्षक एस. डी. धकाते व तालुका सहाय्यक निबंधक (सहकारी संस्था) सिताराम भोजणे यांची नियुक्ती केली आहे. तर, दुसरीकडे जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) वर्धा यांनी २९ एप्रील ला व्यापाऱ्यांना नोटीस जारी करुन गत दोन वर्षात म्हणजे सन २३-२४ व २४-२५ मध्ये झालेल्या व्यवहाराची माहिती मागीतली असुन यात सि ए चा अहवाल व केलेल्या खरेदी विक्रीचा व्यवहार अपेक्षीत आहे. या व्यवहाराची माहिती सात दिवसाचे आत बंद लिफाफ्यात देण्याचे निर्देश जारी केले आहे. हे पत्र व्यापाऱ्यांना शुक्रवारी (दोन) मिळाले मात्र आज पर्यंत व्यापाऱ्यांनी याची माहिती सादर केली नसल्याने ते टाळाटाळ तर करीत नाही ना अशी शंका घेतल्या जात आहे.

दोन वर्षात सुमारे दोन कोटी रुपयाच्या उपकाराची चोरी

    आर्वी परिसरात २३ जिनींग प्रेसींग फॅक्टरी आहेत. या फॅक्टरींना दर वर्षी सुमारे २० लाख क्विंटल कापसाची गरज पडते. ३०/७० च्या आरोपा प्रमाणे जर त्यांनी फक्त चार लाख क्विंटलचा उपकर कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये भरला असेल तर १६ लाख क्विंटल मालाच्या उपकराची चोरी केल्याचे दिसते. सरासरी ६० रुपये क्विंटल प्रमाणे जरी आपण हिसोब धरला तर, १६ लाख क्विंटलचा ९६ लाख रुपयाचा उपकर व्यापाऱ्यांनी बाजार समिती मध्ये भरायला पाहिजे होता. म्हणजेच केलेल्या आरोपा प्रमाणे दोन वर्षात एक कोटी ९२ लाख रुपयाच्या उपकराची चोरी झाली असल्याचे यावरुन दिसुन येते.

जर दस्ताऐवज पुरवले नाही तर होणार कडक कारवाई

जर जिनींग प्रेसींग फॅक्टरीच्या मालकांनी गत दोन वर्षात केलेल्या खरेदी विक्रीच्या व्यवहाराची माहिती शासनाला व समितीला दिली नाही तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल अशी माहिती चौकशी समितीच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button