शिवसेना (ठाकरे)गटाची वर्धा जिल्ह्यातील गळती काही थांबे ना, आम. भोंडेकर व जिल्हा संपर्क प्रमुख राज दिक्षित यांचा ठाकरे गटाला झटका.
वर्धा जिल्ह्यातील माजी प्रमुख पदाधिकाऱ्यांनी घेतला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश
वर्धा, दि. 22:- शिवसेना (ठाकरे) गटातील गळती काही केल्या थांबत नसल्याचे दिसून येत असून मंगळवारी (दि. २२) वर्धा, आर्वी, आष्टी, देवळी, पुलगाव तालुक्यातील माजी प्रमुख पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश घेतला असून शिवसेनेचे विदर्भ संपर्कप्रमुख आमदार नरेंद्र भोंडेकर व वर्धा जिल्हा संपर्क प्रमुख राज दिक्षित यांनी दिलेला मोठा झटका आहे
मुंबई येथील मुक्तागिरी बंगल्यावर प्रवेश कार्यक्रम झाला. यात शिवसेना (ठाकरे) गटाचे माजी सहसंपर्क प्रमुख रवी बालपांडे व माजी जिल्हा प्रमुख प्रशांत शहागडकर यांच्या नेतृत्वात, श्रीकांत उर्फ बाळू मीरापूरकर, माजी उपजिल्हा प्रमुख दशरथ जाधव, अजिंक्य तांबेकर, डॉ. निलेश गुल्हाने, माजी तालुका प्रमुख चंद्रशेखर नेहारे, उप तालुका प्रमुख निलेश मोटघरे, आशिष वैरागडे, संदीप टिपले, माजी शहर प्रमुख सचिन मांडवकर यांनी शिवसेनेत प्रवेश घेतला आहे.
मुंबई वरून नेमलेल्या संपर्क प्रमुखांच्या व जिल्हा प्रमुखांच्या चुकीच्या धोरणामुळे वर्धा जिल्ह्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला गळतीला सुरवात झाली असून अवघ्या तीन ते चार वर्षात पक्ष सोडून जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे आणी याला जिल्हा प्रमुख जबाबदार असल्याची चर्चा आहे
यावेळी शिवसेनेचे प्रवक्ते राहुल लोंढे, युवासेनेचे हर्षल शिंदे तसेच शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते. सचिन मांडवकर शहर प्रमुख माजी यांनी सुद्धा प्रवेश घेतला