Maharashtraसार्वजनीक माहिती

पाणी साठा भरपुर मात्र प्राधीकरणाने निर्माण केली कृत्रीम टंचाई, गत एक महिण्या पासुन शहरात होत आहे पाण्याची मारामार

अधीकाऱ्यांना लाखो रुपयाची मलाई देणारा पाईप लिलाव थांबवील्याचा परिणाम

   आर्वी,दि.२५:- लाडेगाव लगतच्या वर्धा नदी मध्ये पाण्याचा भरपुर पुरवठा असतांना सुध्दा महाराष्ट्र जिवन प्राधिकरणाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नागरिकांना त्रस्त करण्याकरीता कृतीम पाणी टंचाई निर्माण केली असल्याने गत एक महिण्यापासुन शहरात पाण्याची मारामार होत आहे. बड्या अधिकाऱ्यांना लाखो रुपयाची मलाई मिळवुन देणारा इंग्रज कालीन पाईप लाईनचा लिलाव थांबवील्याचा तर हा परीणाम नाही ना? असे सुध्दा बोलल्या जात आहे.

गत एक महिण्या पासुन शहरातील कन्न्मवार नगर, सरस्वती नगर, संभाजी नगर, वल्लभ नगर ऐवढेच नव्हे तर पुर्ण शहरात येथील जिवन प्राधीकरण विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कृतीम पाणी टंचाई निर्माण केली असल्याने त्रस्त झालेल्या नागरिकांनी आमदार दादाराव केचे यांना निवेदन देवुन पाणी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे.

निवेदन देणाऱ्यांमध्ये  मनोज पोटे, सुधीर कारमोरे, रोशन गायकवाड, संजय भालतडक, रमेश मोदीमहात्मा, रमेश मेद्रे, धर्मदत्त गुरे, प्रमोद पोटे, नरेश गायकवाड, भास्कर खंडारे, चेतन वसुले, रामराव हिरवे, प्रमोद यत्रे, मनोज राऊत, प्रशांत कपले, प्रमोद गुलाबराव पोटे, यशवंत काळबांडे, मधुकर कुसरे, भूषण सुकलकर आदिंचा समावेश आहे.

पाईप लाईन विकण्याचा फसला घाट आणी……

शहराला पाणी पुरवठा करण्याकरीता इंग्रजांनी सारंगपुरी तलावापासुन शहरा पर्यंत सुमारे दोन किलोमीटर लोखंडी पाईप लाईन टाकली आहे. हि पाईप लाईन विकुन मलाई खाण्याचा अधिकाऱ्यांचा घाट होता. निवीदा सुध्दा निघाल्या. करारनामा होणारच होता तर याची माहिती मिळाली तक्रारी सुध्दा झाल्या आणी महाराष्ट्र जिवन प्राधीकरण अधिकाऱ्यांच्या तोंडातुन मलाईचा घास खाली पडला. काम थांबले. मात्र यामुळे संतप्त झालेल्या अधिकाऱ्यांनी पाणी पुरवठा योजना चालवीण्यास नकार घंटा दिली होती. याचाच तर हा परिणाम नाही ना? अशी शहरात चर्चा असुन अस असेल तर अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button