आर्वी शहर कचऱ्याच्या विळख्यात, शिवसेना (उबाठा) गटाने दिले निवेदन

आर्वी,दि.३०:- गलीबोळीत असलेले कचऱ्याच्या ढिगाऱ्यामुळे सगळीकडे घाणीचे सम्राज्य पसरले आहे. नागरिकांच्या आरोग्याला धोका पोहचण्याची दाट शक्यता असल्याने कचऱ्याच्या विळख्यात अडकलेल्या शहराला तात्काळ यातुन मुक्त करा अन्यथा तिव्र आंदोलन करण्यात येईल अशी मागणी शिवसेना (उबाठा) पक्षाची असुन विधानसभा समन्वयक प्रदिप गौतम यांच्या नेतृत्वात नगर परिषदेला निवेदन दिले आहे.
शहराची बाजार पेठ, विश्रामगृह परिसर, वार्डातील प्रत्येक गल्ली बोळीत, ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे दिसुन येतात. हाच कचऱ्या नाल्यामध्ये जात असल्याने नाल्या सुध्दा तुडूंब भरलेल्या आहे. परिणामी शहरात किटक व मच्छरांचे साम्राज्य पसरले असुन यामुळे रोगराई वाढण्याची शक्यता बळावली आहे. नगर परिषद स्वच्छतेवर लाखो रुपये खर्च करते तरी सुध्दा पसरलेल्या घाणीच्या साम्राज्याच्या गोडबंगाल कळत नाही. स्वच्छता अभियान कुठे गडप झाले याचा सुध्दा पत्ता लागत नसल्याचे आरोप या निवेदना मधुन करुन त्वरीत यावर करावाई करण्यात यावी अन्यथा आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल अशी निवेदना मधुन मागणी करण्यात आली आहे.
निवेदन देणाऱ्यांमध्ये तालुका प्रमुख गुड्डू गावंडे, शहर प्रमुख मनीष अडसर, विजय घोळवे, राजु कुदरे, पिंटु छांगाणी, अजय अवथनकर, प्रकाश खांडेकर, अमीत करतारी, शिव कुंभारे, शैलेश मडामे, अभय ढोले, नितीन रहाण, कमलेश सोनवणे, नरेश वडणारे, सर्व्हेश देशपांडे आदिंचा समावेश आहे.