संत भुमी टाकरखेडा रस्त्याची दुरावस्था, बांधकाम विभागाला निर्देश द्यावे, अन्यथा तिन एप्रील पासुन उपोषण करणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना, सामाजीक कार्यकर्ते अरवींद लिल्लोरे यांची मागणी

आर्वी,दि.७:- संत लहानुजी महाराज यांच्या वास्तव्याने पुणीत झालेल्या संत भुमी टाकरखेडा येथे जाण्याकरीता निर्माण केलेल्या नांदपुर-टाकरखेडा व शिरपुर टाकरखेडा या दोन्ही मार्गाची दुरावस्था झाली असुन याचे बांधकाम तात्काळ करण्याचे निर्देश संबंधीत विभागाला देण्यात यावे अन्यथा तिन एप्रील पासुन उपोषण करण्यात येईल अशी मागणी नांदपुर येथील समाजीक कार्यकर्ते अरवींद लिल्लोरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली असुन त्यांनी येथील उपविभागीय अधिकारी विश्वास शिरसाट यांच्या माध्यमातुन शुक्रवारी (ता.सात) निवेदन पाठवीले आहे.
अवलीया मुर्ती लहानुजी महाराज यांच्यावर परिसरातीलच नव्हे तर राज्यातील श्रध्दावान लोकांचा मोठ्या प्रमाणात विश्वास आहे. येथे दररोज कुणाच्याना कुणाच्या स्मृती पित्यार्थ भोजनदान व विविध प्रकारचे कार्यक्रम होतात. या कार्यक्रमला राज्याच्या विविध ठिकाणावरुन शेकडो भावीक भक्त आर्वी मार्गे टाकरखेडला जातात मात्र सार्वजनीक बांधकाम विभागाने निर्माण केलेले नांदपुर-टाकरखेड व शिरपुर-टाकरखेडा या दोन्ही मार्गाची दुरावस्था होवुन गिटी बाहेर पडली आहे. तर ठिकठिकाणी मोठाले खड्डे पडलेले आहे. या मार्गावरुन प्रवास करतांना वाहन चालकाला तारेवरची कसरत करावी लागते तर प्रवाश्याना शारिरीक व मानसीक त्रास सहन करावा लागतो. याशिवाय टायर पंम्चर होणे, एक्सल टुटने गिट्टीमुळे टायर फाटने आदी प्रकार जरी नित्यनेमाचे असले तरी अपघाताचा सामना सुध्दा करावा लागतो. एखाद्यावेळेस मृत्युला सुध्दा समोरे जाण्याची पाळी येण्याची शक्यता आहे.
खड्डे मुक्त रस्ता हि सरकारची योजना तर आहेच शिवाय नागरिकांची मुलभूत गरज सुध्दा आहे मात्र सरकार आपल्याच योजनेला विसरल्याच दिसुन येत आहे. हे गाव खेड्यामध्ये राहणाऱ्या नागरिकांच दुर्भाग्य असुन एकीकडे सरकार स्मार्ट सिटी बनवीण्याच्या मागे लागले आहे तर दुसरीकडे गावखेड्यांकडे दुर्लक्ष केल्या जात आहे असा आरोप अरवींद लील्लोरे यांचा आहे.
जर तिन एप्रील पुर्वी संबंधीत विभागाने मागणी पुर्ण केली नाही तर आर्वीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात उपोषण करणार असल्याचे त्यांनी या निवेदनात नमुद केले आहे.