सण उत्सव आनंदात पार पाडण्याकरीता सर्वांनी सतर्क राहणे गरजेचे आहे
जिल्हा पोलीस अधिक्षक अनुराग जैन, १०० लोकांना घेणार ताब्यात

आर्वी,दि.१३:- समाज कंटकांकडून समाज माध्यमाव्दारे पसरवील्या जाणाऱ्या बातम्या, धार्मीक व सामाजीक विषयावर होणारे भाष्य यामुळे समाज व्यवस्था ढासळण्याचे प्रकार घडू शकतात यावर बारीक नजर ठेवणे आवश्यक असुन सण, उत्सव आनंदात पार पाडण्याकरीता सतर्क राहणे अत्यंत गरजेचे आहे असे वर्धा जिल्हा पोलीस अधिक्षक अनुराग जैन यांनी येथे प्रतिपादन केले.
मार्च महीणा हा सण उत्सवाचा महिणा असल्यामुळे या दरम्यान कोणतीही अप्रीय घटना घडू नये याकरीता येथील नगर परिषद सभागृहात पोलीस स्टेशनच्यावतीने गुरूवारी (ता.१३) शांतता समितीची बैठक आयोजीत केली होती यावेळी ते मार्गदर्शन करीत होते.
या बैठकीला येथील उपविभागीय पोलीस अधिक्षक देवराव खंडेराव, पोलीस निरीक्षक सतीश डेहणकर, पोलीस उपनिरीक्षक संतोष चव्हाण, गितांजली गारगोटे हे प्रामुख्याने उपस्थीत होते.
पुढे माहिती देतांना त्यांनी सांगीतले की, सण उत्सव आले की समाजमाध्यमांच्या व्दारे फेक बातम्या प्रसारीत करुन अशांतता निर्माण करण्याचा समाजकंटकाचा प्रयत्न असतो. या शिवाय सामाजीक व धार्मीक विषयावर भाष्य करुन धर्मा-धर्मात जाती-जातीमध्ये भांडण लावण्याचे सुध्दा प्रकार घडतात यावर बारीक नजर ठेवणे गरजेचे आहे. याकरीता पोलीस यंत्रणा सक्षम जरी असली तरी नागरिकांच्या सहकार्याची गरज आहे. असा कुठलाही प्रकार नजरेस पडला तर पोलीसांना लगेच कळवा जेणेकरुन त्यावर तत्परतेने कारवाई करुन संभाव्य धोका टाळता येईल् याकरीता त्यांनी आपला मोबाईल नंबर सुध्दा दिला.
उपविभागीय पोलीस अधिकारी खंडेराव यांनी माहिती देतांना सांगीतले की, सण उत्सव आनंदात साजरे व्हावे याकरीता शहरातील व ग्रामीण भागातील १०० लोकांना दोन दिवसाकरीता ताब्यात घेण्यात येणार आहेत. याशिवाय ठिकठिकाणी बॅरिकेटस लावुन व पोलीस बंदोबस्त लावुन असामाजीक तत्वांवर बारीक लक्ष ठेवण्यात येणार आहे.
ठाणेदार सतीश डेहणकर हे म्हणाले की, सण उत्सवा दरम्यान होणाऱ्या गर्दीचा लाभ उचलुन छोडछाडीचा प्रकार सुध्दा घडू शकतो मात्र हे टाळण्याकरीता आम्ही साध्या वेषातील पोलीसांची नियुक्ती केली आहे. शिवाय नशा करुन वाहन चालवीणाऱ्यांवर सुध्दा आमची बारीक नजर आहे.
याशिवाय शांतता समितीचे सदस्य अनील जोशी, दशरथ जाधव, लक्ष्मीकांत साखरे यांनी माहिती देतांना आर्वी शहर हे शांत शहर आहे येथे आज पर्यंत कोणतीही अप्रीय घटना घडली नाही. हिंदु, मुस्लीम, बौध्द, जैन आदि समाजाचे लोक एकोप्याने राहता आणी सगळे सण गुण्यागोवींदाने साजरे करतात.
या बैठकीत विजय अजमीरे, राजेश सोळंकी, सुशिलसिंह ठाकुर, वकील शेख, मोहम्मद जमील, साबीर, अबदुल अनीस तथा गावगावचे महिला व पुरूष पोलीस पाटील उपस्थीत होते.