मराठी माध्यमाच्या शाळा सोमवार (ता.१०) पासुन सकाळ पाळीत, सकाळी ७ ते ११ पर्यंतची शाळेची वेळ असणार, सुट्टया निर्धारण सभेचा निर्णय,
जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी जारी केला आदेश

आर्वी,दि.८:- वाढत्या तापमानाचा विचार करत, वर्धा जिल्हातील प्राथमीक शिक्षक संघटनांनी केलेल्या मागणी प्रमाणे सुट्टया निर्धारण सभेत झालेल्या निर्णयाप्रमाणे मराठी माध्यमांच्या शाळा सोमवार (ता.१०) पासुन सकाळी ७ ते ११ पर्यंत भरवीण्यात येणार असुन जिल्हा परिषद वर्धाचे शिक्षणाधिकारी (प्राथमीक) डॉ. नितू गावंडे यांनी तसे आदेश जारी केले आहे.
वाढत्या उष्णतेचा विध्यार्थ्यांना होणारा त्रास याचा विचार करुन वर्धा जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक संघटनांनी निवेदन देवुन सकाळ पाळीत शाळा घेण्यात यावे अशी मागणी केली होती. या मागणीवर वर्धा जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटना सुट्टया निर्धारण सभेत विचार करण्यात आला आणी सोमवार (ता.१०) पासुन सकाळ पाळीत सकाळी ७ ते ११ या वेळेत शाळा भरवीण्याचा निर्णय घेण्यात आला तर, मुस्लीम धर्मीयांचा रमजान महिना सुरू झाल्यामुळे उर्दु माध्यमाच्या शाळा सोमवार (ता.तिन) पासुन सकाळ पाळीत भरवीण्यात येत आहे. मात्र, शिक्षकांना १५ मिनीट अगोदर शाळेत उपस्थित राहणे अनिवार्य असल्याचे आदेश जिल्हा परिषद वर्धाचे शिक्षणाधिकारी (प्राथमीक) डॉ. नितु गावंडे यांनी जारी केले असुन हा आदेश जिल्हा परिषद, खाजगी प्राथमीक व उच्च प्राथमीक शाळा यांना लागु आहे.