Uncategorized

दुर्दैवी दुर्घटना! उपचार करुन बायकोला घेवुन जाण्याकरीता निघाला आणी वाटतेच अपघात होवुन मृत्यु झाला

सावळापुर घाटात झाला हा अपघात

आर्वी,दि.९:- उपचार करुन बायकोला घरी घेवुन जाण्याकरीता निघालेल्या तरुणाच्या दुचाकीला अपघात झाला आणी यातच मृत्यु झाला. हि दुर्दैवी दुर्घटना लगतच्या सावळापुर घाटात रवीवारी (ता.९) दुपारी १२ वाजताचे सुमारास घडली.

गजानन मोरेश्र्वर उके (३८ वर्ष) असे मृतकाचे नाव असुन ते वर्धा जिल्ह्याच्या हिंगणघाट तालुक्यातील मनसावळी येथील रहीवासी आहे. त्यांचे शेंदुर्जना खुर्द येथील ओमकार फत्तुजी शेंडे यांच्या मुली सोबत सुमारे चार वर्षा पुर्वी लग्न झाले. मात्र, आपत्य न झाल्यामुळे येथील स्त्री रोगतज्ञ डॉ. प्रतिभा पावडे यांच्याकडे उपचार सुरू होते. रवीवारी (ता.९) दोघांचीही सोनोग्राफी करण्यात येणार होती. पत्नी वैष्णवी ही वडील ओमकार शेंडे यांचे सोबत शेदुर्जना खुर्द येथुन पावडे नर्सिंग होम मध्ये पोहचले. मात्र, एम एच ३२ ए डब्लु ४१५४ क्रमांकाच्या दुचाकीने निघालेला गजानन उके हा पोहचला नाही. सासरा ओमकार याने मोबाईल वरुन संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र प्रतिसाद मिळाला नाही. मात्र थोड्याच वेळात त्याचा अपघात झाल्याचे कळले. वर्धा मार्गावरील सावळापुर घाटात हा अपघात झाला असुन या अपघातात गजानन उके यांच्या डोक्याला जबर मार लागला आहे. याच मार्गाने आर्वी कडे येत असलेल्या मुख्याध्यापक पंतुसींग जाधव यांनी १०८ क्रमांकावर संपर्क साधुन ॲम्बुलन्स बोलावली. दरम्यान पोलीस सुध्दा पोहचले.

ठाणेदार सतिश डेहणकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक संतोष चव्हाण, संजय बाकडे, रोशन टेंबरे, खेमसींग कोहचडे हे प्राथमीक तपास करीत आहे

.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button