Maharashtra

देशासोबतच राज्यात सुध्दा येत्या सत्रापासुन नवीन शैक्षणीक धोरण राबवीणार माझी शाळा बुध्दीवंतांची शाळा म्हणुन नाव रुपास यायला पाहिजे पालक मंत्री पंकज भोयर

कला, वाणिज्य व विज्ञान महाविध्यालयाच्या इमारत बांधकामाचे भुमीपुजन

     आर्वी,दि.१:- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देशातील पारंपारिक शिक्षणाला नॅशनल बेस शिक्षणाची जोड देण्यावर भर असुन त्या दृष्टिने आपण मार्गक्रमण करीत आहो. येत्या शैक्षणीक सत्रा पासुन देशासोबतच राज्यात सुध्दा नवीन शैक्षणीक धोरण टप्याटप्याने राबवीण्यात येणार आहे. तर दुसरीकडे माझी शाळा बुध्दीवंतांची शाळा नावा रुपस यायला पाहिजे याकरीता प्रयत्न सुरू आहे असे वर्धा जिल्ह्याचे पालक मंत्री पंकज भोयर यांनी येथे प्रतिपादन केले.

      पीएम उषा योजनेअंतर्गत निवड झालेल्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या इमारत बांधकामाचे भुमीपूजन शुक्रवारी (ता.२८) त्यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख अतिथी म्हणुन ते मार्गदर्शन करीत होते.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष कृषक शिक्षण संस्था व भारत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा ॲङ शोभाताई काळे ह्या होत्या तर, आमदार सुमीत वानखेडे, माजी आमदार दादाराव केचे, भारत शिक्षण संस्था व कृषक शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष दिनेश देशमुख, सचिव प्रदीप काळे, दोन्ही संस्थेचे कोषाध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संदिप काळे, कला वाणिज्य व विज्ञान महाविध्यालयाचे प्राचार्य डॉ. रवींद्र सोनटक्के हे प्रमुख अतिथी होते.                   पुढे मार्गदर्शन करतांना त्यांनी, वर्धा जिल्ह्यातील आठ शाळांची निवड झाल्याची माहिती दिली. यात आर्वी, आष्टी, कारंजा या तालुक्यातील तिन शाळाचा समावेश असुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या आठ ही शाळांची जबाबदारी त्यांच्यावर सोपवीली असल्याची सांगीतले. या आठही शाळा राज्यात मॉडेल शाळा म्हणुन उभ्या होईल आणी यातुन उत्कृष्ट शिक्षण देण्याच काम सरकारच्या माध्यमातुन करण्यात येईल असे आश्वासन दिले.

    आमदार सुमीत वानखेडे यांनी मार्गदर्शन करतांना कौशल्य विकासावर आधारीत शिक्षण व प्रशिक्षण देण्यावर भर दिल्या गेल पाहिजे अपेक्षा वर्तवुन यातुन जास्तीत जास्त कौश्यल्यपुर्ण मनुष्य बळ  निर्माण होईल आजच्या परिस्थीतीत देशालाच नव्हे तर जगाला सुध्दा यांची गरज असुन यातुन बेरोजगारीची समस्या दुर होण्यास मदत होईल्‍ असे सांगीतले.

  माजी आमदार दादाराव केचे यांनी इमारत बांधकामाकरीता निधी दिल्याबद्दल केंद्र सरकारचे आभार मानले. प्रदिप काळे यांनी देखील सरकारचे आभार मानून शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्याकरता निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल केंद्र सरकारचे आभार मानले. कृउबास सभापती श्री.संदीपभाऊ काळे यांनी शिक्षणासोबतच ग्रामीण भागामध्ये खेळाच्या देखील संधी उपलब्ध व्हाव्यात याकरता शासनाने लक्ष पुरवावे असे प्रतिपादन ॲङ शोभाताई काळे यांनी अध्यक्षीय मार्गदर्शन करतांना  सुसंस्कृत पिढी निर्माण करण्यासाठी शहरी सोबतच ग्रामीण भागातील देखील शाळा अग्रेसर असतात असे सांगितले.

   या  प्रसंगी  कृषी उत्पन्न बाजार समिती, आर्वी, खरेदी विक्री संस्था आर्वी, जिनिंग प्रेसिंग संस्था आर्वी, यांच्या पदाधिकाऱ्यांनी   पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांचा सत्कार केला. सोबतच आमदार सुमित  वानखेडे व माजी आमदार दादारावजी केचे यांचा देखील महाविद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या योजनेत उत्कृष्ट कामगीरी करणाऱ्या मॉडेल कनिष्ठ हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आर्वी, मॉडेल हायस्कूल देऊरवाडा व मॉडेल हायस्कूल वाढोणा आदिंच्या मुख्याध्यापकांचा देखील कर्मचाऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. सोबतच धनुर्विद्या खेळामध्ये राज्यस्तरावर सुवर्णपदक प्राप्त केल्याबद्दल महाविद्यालयाची विद्यार्थीनी कु.भाग्यश्री डहाके हिचा देखील पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कला, वाणीजय व विज्ञान महाविध्यालयाचे प्राचार्य डॉ. रवींद्र सोनटक्के यांनी प्रस्तावना मांडतांना विघ्यालयाच्या वाटचालीची माहिती देवुन  पीएम उषा योजने संदर्भात सविस्तर माहिती दिली.

कार्यक्रमाचे संचालन प्रा. दर्शनकुमार चांभारे यांनी केले. तर, आभार  आयक्यूएसी समन्वयक डॉ.विजय खडसे यांनी मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वीत्तेकरीता महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी आदिंनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button