छत्रपती शिवाजी महाराज पंचाग पाहत बसले असते तर त्यांनी ३६१ किल्ले जिंकले नसते बेधुंदकार गोविंद पोलाड

आर्वी,दि.१:- मंत्रातंत्राने, करणीनी तोटक्याने लोक मेले असते तर भगवान श्रीरामाना धनुष्यबाण हाती घेण्याची गरज पडली नसती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पेन हातात घेवुन संवीधान लिहीण्याची गरज पडली नसती, शिवाजी महाराजांना हातात तलवार घेण्याची गरज पडली नसती ते जर पंचाग पाहत बसले असते तर, त्यांनी ३६१ किल्ले जिंकले नसते असे प्रतिपादन बेधुंदकार गोवींद पोलाड यांनी येथे केले.
येथील स्व. राजीव गांधी स्टेडीयम वर, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड आदि समवीचारी संघटनांच्यातीने नुकतेच शिवव्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते प्रमुख वक्ते म्हणुन मार्गदर्शन करीत होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष मराठा सेवा संघाचे उपाध्यक्ष विजय चौधरी हे होते तर, उपविभागीय अधिकारी विश्वास शिरसाट, कृषी अधिकारी कांबळे, अनिल गोहाड, कृषक इंग्लीश स्कुलच्या प्राचार्या प्रणिता हिवसे, कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष तथा संभाजी ब्रिगेड वर्धाचे जिल्हाध्यक्ष प्रफुल क्षिरसागर हे प्रमुख अतिथी होते.
पुढे त्यांनी, समाजात रुजलेल्या अंधश्रध्देवर चांगलाच घणाघात केला. लक्ष्मण मुर्च्छीत झाले तेव्हा भगवान श्रीरामांना सुध्दा वैदुला बोलवावे लागले जडीबुटीचा वापर करावा लागला त्यांनी सुध्दा मानवी नितीचा आधार घेतला तर तुम्ही का मंत्रतंत्र व जादुटोण्याच्या अंधार कोठडीत खीतपत पडले आहात असा प्रश्न निर्माण करुन छत्रपती शिवाजी महारांजाची शिकवण व वैज्ञानीक पध्दतीचा वापर करुन आपली प्रगती करा असा सल्ला दिला. याशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांचे सामाजीक एकतेचे, त्यांनी शेतकऱ्यांकरीता राबवीलेल्या योजना आदिंची माहिती दिली तर, दुसरीकडे वाढती महागाई, शेतकरी विरोधी शासकीय धोरण व राजकारण्यांवर चांगलीच टिका केली.
प्रफुल क्षिरसागर यांनी इतिहासाची व्याख्या करतांना भुतकाळ आणी वर्तमान काळाचा सातत्यपुर्ण संवाद साधन म्हणजे इतिहास आहे असे सांगुन जिथे विसंवाद सुरू होतो तेथे संवादाची अधोगती होते आणी म्हणुनच आम्ही शिवकुळाचा वारसा जपायला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली. सज्जनांनी आता एकत्र आल पाहिजे याशिवाय गावगाडे उभे राहणार नाहीत. शिवकुळाचा वारसा असतांना अपण जर त्याचे वाहक नसु तर मला वाटत खऱ्या अर्थान छत्रपतींच्या जयंतीला केवळ आणी केवळ जल्लोश करुन भागणार नाही असे सांगीतले.
प्रणीता हिवसे ह्या म्हणाल्या की, ‘न शोभणारी कृत्य करीत जल्लोश करणारी मुले जेव्हा समाजाच घटक बनतील तेव्हा तो समाज कसा असेल’ अशी भिती व्यक्त करुन प्रत्येकाला वाटत की माझ्या घरी शिवराया याव पण शिवराया घडवावा लागतो शिवराया घडवीण्यासाठी मॉ जिजाऊ सारखे परिश्रम, कष्ट घ्यावे लागते, त्रास सहन करावा लागतो याशिवाय सहनशिलता धैर्य बाळगण्याची गरज आहे असे सांगीतले. शिवराय हा विचार आहे तो आमच्या मनात डोक्यात ठासुन भरलेला असला पाहिजे शिवराया हा संस्कार आहे तो तुमच्या नसानसात आमच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबात धावत असला पाहिजे फक्त बोलुन शिवराया निर्माण होणार नाही, तर तरुण पिढी मध्ये शिवसंस्कार रुजवायला पाहिजे तेव्हाच खर सुराज्य येईल असा संदेश दिला.
या शिवाय विजय चौधरी यांनी अध्यक्षीय मार्गदर्शन केले तर, उपविभागीय अधिकारी विश्वास शिरसाट यांनी समयोचीत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाची प्रस्तावना रोहन हिवाळे यांनी मांडली, संचालन रवींद्र घाडगे यांनी केले, लकी लोखंडे यांनी शिवगर्जना सादर केली, तर, प्रमोद नागरे यांनी आभार मानले. .
कार्यक्रमाच्या यशस्वीत्तेकरीता, प्रशांत ढवळे, संतोष डंभारे, संजय किटे, मारोडकर सर, समीर खोंडे, नरेश निनावे, सविनय काळे, योगेश बरवटकर, शुभम राजे, छाया बावणे, कविता अजमिरे, लीलाधर गुल्हाने, मयुरी लोखंडे, निलेश घुगरे, वीर कठाणे, मोहित गिरी, ज्योती जाधव. पवन भोबेकर तथा संघटनांनच्या पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले.