१९४९ चा असंवैधानीक व्यवस्थापन कायदा रद्द करा बौद्धगया येथील महाबोधी बौद्धविहार बौद्ध धर्मीयांच्या ताब्यात द्या
आर्वी येथील बौद्ध अनुयायांची मागणी, केला एक दिवशीय धरणे आंदोलन

आर्वी,दि.३:-१९४९ चा महाबोधी बौद्ध विहारचा असंवैधानीक व्यवस्थापन कायदा रद्द करा. बोधगया येथील महाबोधी महाविहार महंतांच्या ताब्यातुन मुक्त करुन बौद्ध धर्मीयांच्या स्वाधीन करा. महाबोधी महाविहार परिसरात चालणारे पिंडदान विधी बंद करा आदि मागण्याकरीता येथील बौद्ध अनुयायांनी एक दिवशीय धरणे आंदोलन केले आणी उपविभागीय अधिकारी विश्वास सिरसाट यांच्या माध्यमातुन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेद्र मोदी व बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना निवेदन पाठवीले.
भंते संजीव व भंते आनंद यांच्या नेतृत्वात शेकडो बौद्ध् धर्मीय अनुयायी व समवीचारी लोकांच्या सहभागाने सोमवारी (ता.तिन) येथील नगरपालीका प्रशासकीय इमारती समोर हे धरणे आंदोलन झाले.
बिहार राज्यातील बौद्ध गया येथे तथागत भगवान बुध्दांना ज्ञानप्राप्ती झालेली होती. येथुनच त्यांनी बौद्ध धर्माचा प्रचार व प्रसार केला आहे. हे लक्षात ठेवुनच प्रियदर्शी सम्राट अशोक यांनी तथागत भगवान बुध्दांच्या प्रेरणेने महाबोधी महाविहार बांधलेले आणी म्हणुनच हे ठिकाण बौध्दधर्मीयांच्या आदरस्थानी आहे. या दृष्टीने पाहता या ठिकाणावर बौद्ध् धर्मीयांचाच अधिकार असायला पाहिजे. मात्र तत्कालीन सरकाने १९४९ मध्ये असंवैधानीकरीत्या महाबोधी महाविहार व्यवस्थापन कायदा लागु केला आणी या माध्यमातुन महाबोधी मंदिर व्यवस्थापन समिती कडे (बीटीएमसी) देखरेख व नियंत्रण ठेवण्याचे काम सोपवीले.
१९४९ च्या व्यवस्थापन कायद्या प्रमाणे या समीती मध्ये चार हिंदू ब्राम्हण महंत आणी चार बौद्ध भिक्षू सभासद असावे आणी हिंदु समाजाचा जिल्हाधिकारी हा अध्यक्ष असावा असे नियमांकीत केले आहे. त्या जिल्ह्याचा जिल्हाधिकारी हा हिंदु नसेल तर शेजारच्या जिल्ह्याचा जिल्हाधीकारी हा अध्यक्ष राहिल असे सुध्दा यात नमुद आहे. परिणामी या ठिकाणावर हिंदु धर्मीयांचे वर्चस्व निर्माण झाले आहे. एकीकडे तथागत भगवान बुध्दांचे सत्यावर आधारीत प्रबोधन होते तर दुसरीकडे या उलट हिंदु धर्माचे कर्मकांड आणी विधी चालतात असा आरोप या निवेदनाच्या माध्यमातुन करुन हे अन्याय कारक असुन तथागतांच्या या कर्मस्थळावर बौद्ध धर्माचेच आचरण व्हावे अशी मागणी केली आहे. काही समाजकंटक या महाविहाराला शिव मंदिर म्हणुन चुकीची ओळख देण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप सुध्दा या निवेदना मधुन करण्यात आला आहे. देशातीलच नव्हे तर जगात सुध्दा प्रत्येक धर्मीयांची प्रार्थनास्थळे ज्यांच्यात्यांच्याच ताब्यात आहे तर मग तथागत भगवान बुद्धांचे महाबोधी महाविहार हा बौद्ध धर्मीयांच्या ताब्यात का नसावे? असा आंदोलन कर्त्यांचा प्रश्न आहे.
या धरणे आंदोलनात प्रा.डॉ. विजया मुळे, प्रा. रवींद्र दारुंडे, प्रा. पंकज वाघमारे, मेघराज डोंगरे, दशरथ जाधव, बाळा जगताप, गौतम कुंभारे, भिमराव धनवर, सुजित भिवगडे, सुरज मेहरे, मधुकर सवाळे, पुरण सुर्यवंशी, शुभांगी भिवगडे, प्रल्हाद देशभ्रतार, दिपक भोगे, मुकूंद पखाले, हिरामनजी बोरकर, राजाराम डोंगरे, संदिप सरोदे, अनिल खैरकार, राजेंद्र वानखडे, सुरेश भिवगडे, बंडू पाचोडे, नाना हेरोडे, सुभाष दिघाडे, शारदा कठाणे, यशोधरा सोनोने, चंदा नाईक, जयश्री जिवने, संध्या जिवने, इंदुबाई नाखले, विजय गडलींग, भावना दारुंडे, विजय नाखले, प्रतीभा मनवर, रजनी ढाणके, ज्योती पाटील, सुशीला दहाट, उषा तायवाडे, मंदा सवाई तथा शेकडो अनुयायी सहभागी झाले होते.