राजकीय

… अखेर माजी आमदार दादाराव केचे यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज त्यांच्या उमेदवारीला विरोध करणाऱ्यांची तोंडे झालीत लाल

पक्षांतर्गत विरोधकानी केला मोठा विरोध मात्र फुसका ठरला, उमेदवारी अर्ज दाखल करतांना आमदार सुमीत वानखेडे होते हजर, १३ महिण्याकरीता मीळणार संघी, आमदार वानखेडे व केचे यांची जवळीक विकासाला देणार गती.

     आर्वी,दि.१७:- केंद्रीय गृहमंत्री अमीत शहा यांनी आपला शब्द पाळला असुन माजी आमदार दादाराव केचे यांना भाजपाने विधान परिषदेची उमेदवारी जाहिर केली. त्यांनी सोमवारी (ता.१७) आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. मात्र यामुळे त्यांच्या उमेदवारीला विरोध करणाऱ्यांची तोंडे रगंपंचमीच्या वातावरणात रंगाची उधळण न होता सुध्दा लाल झाली असल्याची जोरदार चर्चा आहे.

नुकत्याच विधानसभेच्या झालेल्या निवडणुकीत विजयी झाल्यामुळे राज्यातील विधानपरिषदेच्या पाच जागा रिक्त झाल्या होत्या. यातील तिन जागा भाजपकडे असुन संदीप जोशी, संजय केणेकर व दादाराव केचे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. राष्ट्रवादी अजीद दादा गटाकडून संजय खोडके यांनी तर, शिवसेना शिंदे गटाकडून चंद्रकांत रघुवंशी यांनी सोमवारी (ता.१७) निवडणुक निर्णय अधिकारी यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला तर, विरोधकांकडून सुध्दा एक अर्ज दाखल झालेला आहे.

  नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत माजी आमदार दादाराव केचे यांनी आर्वी विधानसभेची  भाजपाकडून उमेदवारी मागीतली होती. मात्र, त्यांना डावलून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मानद सचिव सुमीत वानखेडे यांना उमेदवारी दिल्या गेली. यामुळे संत्पत झालेल्या माजी आमदार दादाराव केचे यांनी बंडखोरी करीत उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांची जमीनीवरचा माणुस म्हणुन असलेली जनमानसातील प्रतीमा व लोकांचे त्यांच्यावर असलेलं प्रेम यामुळे भाजपाचे मतदार दुभागतील आणी उमेदवाराला निवडूण येणे कठीण होईल्‍ याचा विचार करुन राज्यातील बड्या नेत्यांनी त्यांना उमेदवारी मागे घेण्याकरीता विनवण्या केल्या मात्र त्यांना यश आले नाही. शेवटी केंद्रीय गृहमंत्री अमीत शहा यांचा सहारा घ्यावा लागला. राज्याच्या भाजप अध्यक्षांनी त्यांची तातडीने केंद्रीय गृह मंत्री अमीत शहा यांच्यासोबत भेट घडवीली. याकरीता चार्टर विमानाचा वापर करण्यात आला. या भेटी दरम्यान झालेल्या चर्चेत केंद्रीय गृह मंत्री अमीत शहा यांनी विधान परिषदेची उमेदवारी देण्याचा शब्द दिला होता. हा शब्द आज खरा ठरला आहे.

पक्षांतर्गत विरोधकानी केला मोठा विरोध मात्र फुसका ठरला

     तिन हजारवर  असलेली भाजप वाढवीण्याकरीता दादाराव केचे यांनी अहोरात्र परिश्रम घेतले. ज्यांच्या मागे राजकीय पार्श्वभुमी नव्हती अश्यांना सुध्दा राजकारणात आणले. राजकीय लाईकी नसतांना सुध्दा मोठ मोठ्या पदावर विराजमान होण्याचा बहुमान मिळवून दिला. पक्षांतर्गत मोठमोठी पदे दिली मात्र राजकीय हवेच रुख पालटल आणी अनेकांनी आपले असली रंग दाखवीने सुरू केले. ऐवढ्यावरच ते थांबले नाही तर, दादाराव केचे यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळु नये याकरीता मुंबई गाठली मात्र येथे सुध्दा त्यांची डाळ शिजली नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना सुध्दा विनवणी केली. मात्र त्यांनी सुध्दा त्यांची मागणी धुडकावून लावली. राज्यातुन तिनच नावे दिल्लीला पोहचले तरीही यांची मुजोरी सुरूच होती. शेवटी रवीवारी (ता.१६) पक्षाने उमेदवारी जाहीर केली आणी विरोधकांचा बार फूसका ठरला.

उमेदवारी अर्ज दाखल करतांना आमदार सुमीत वानखेडे होते हजर

     सोमवारी (ता.१७) भाजप उमेदवार दादाराव केचे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी त्यांचे सोबत पालक मंत्री पंकज भोयर, खासदार रामदास तडस, आमदार सुमीत वानखेडे, आमदार प्रताप अडसड, माजी जिल्हापरिषद अध्यक्षा सरिता गाखरे, पत्रकार विजय अजमीरे, राजु डोर्लीकर, अनील दारोकर आदि हजर होते.

१३ महिण्याकरीता मीळणार संघी

     नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत विधान परिषद सदस्य प्रवीण दटके, रमेश कराड, गोपीचंद पडाळकर, राजेश विटेकर व आयशा पडवी हे निवडूण आल्यामुळे यांच्या पाच जागा रिक्त झाल्या होत्या. यांचा मे २०२६ पर्यंत कार्यकाळ आहे. या उर्वरीत काळाकरीताच हि निवडणुकी होणार आहे. त्यामुळे गुरूवारी (ता.२७) निवडुन जाणाऱ्या सदस्यांना अवघ्या १३ महिन्यांचीच संधी मिळणार आहे.

आमदार वानखेडे व केचे यांची जवळीक विकासाला देणार गती

     गोड स्वभावाचे व सगळ्यासोबत सलोखा ठेवुन वागणारे विध्यमान आमदार सुमीत वानखेडे व जमीनीवरील कार्यकत्यांना घेवुन चालणारे माजी आमदार दादाराव केचे यांची या मध्यमातुन साधल्या जाणारी जवळीक विधानसभेच्या विकासाला गती देणारी ठरणार असल्याची भावना मतदार संघातील नागरीकांची आहे. मात्र पक्षाअंतर्गत असलेल्या संधीसाधुना हे भावणार काय? असाही प्रश्न निर्माण केल्या जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button