Maharashtraदुर्घटना

आर्वीच्या कापड मार्केटला लागली आग, पाच दुकाने जळुन झाली खाक, लाखो रुपयाचे झाले नुकसान

निरंकर प्रोव्हिजन मधील फ्रीजचा ब्लाष्ट झाल्याने लागली , तब्बल चार तासानंतर आली आग आटोक्यात

आर्वी,दि.१९:- मार्केट मधील दुकानदार आपआपली प्रतिष्ठाने उघडत असतांनाच निरंकारी प्रोव्हीजन मधील फ्रीज ब्लाष्ट होवुन मोठा आवाज झाला आणी यामुळे लागलेल्या आगीने पाहता पाहता रौद्ररुप धारण केले व लगतच्या दुकानांना सुध्दा ताब्यात घेतले. तब्बल चार तासा नंतर आग आटोक्यात आली मात्र तो पर्यंत पाच दुकाने जळुन खाक झाली होती. यात लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे. बुधवारी (ता.१९) येथील कापड माकेट मध्ये हि दुर्घटना घडली.

सकाळी १० वाजताचे सुमारास कापड मार्केट मधील दुकानदार आपआपली प्रतिष्ठाने उघडत असतांना मोठा आवाज झाला रवी लालवाणी यांच निरंकार प्रोव्हिजन मधुन आगीचे लोळ बाहेर येवु लागले. तिने लगतच्या धनश्याम लालवाणी यांचे लक्ष्मी बुक डेपो, मनोहर मोटवाणी यांचे सारथी हॅडलुम, मागच्या बाजुला असलेल्या ॲङ रवीसींग गुरूंनासिंगानी याचे कार्यालय, मोहसीन खान याचे रजा मेन्स रेडीमेड कापड दुकाने पाहता पाहता आपल्या कचाट्यात घेतलं. मात्र रौद्ररुप धारण केलेली हि आग इतर दुकानांन पर्यंत पोहचण्यापुर्वीच येथील नगर परिषदेच्या अग्नीशामन दलांची दोन्ही वाहने येवुन धडकली. त्यांनी पाण्याचा जोरदार मारा करुन आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. ज्या दुकानाला सुरुवातीला आग लागली त्या दुकानाचे शटर बंद असल्यामुळे दुकानात असलेल्या प्लॅस्टीकच्या पिशव्या, लहान मुलांचे खेळोणे, थंड पेयाच्या प्लॅस्टीक बाटल्या धुमसतच होत्या आणी येथुन येणारे आगीचे लोळ बाजुच्या दुकांनांना घेरत होते. अखेर दुकानावरील टिन बुलडोझरने काढल्यानंतर एक वाजताचे सुमारास आगीवर ताबा मिळवीता आला.  यात ॲड. रवीसींग गुरुनासिंगानी यांच्या कार्यालयातील न्यायालयीन दस्ताऐवज, मनोहर मोटवाणी यांच्या दुकानातील कापडे, मोहसीन खान यांच्या दुकानातील रेडीमेड कापडे आणी लक्ष्मी बुकडेपो मधील पुस्तके, कागद आदि जळुन खाक झाली.

याची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी देवराव खंडेराव, ठाणेदार सतिश डेहणकर, पोलीस उपनिरीक्ष्क बेलसरे, संदिप चव्हाण, संतोष चव्हाण, पोलीस कर्मचारी निरज लोही, दिगांबर रुईकर, अमर हजारे, मनीष राठोड, नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. किरण सुकलवाडकर, विधृत विभागाचे अधिकारी व कर्मचारी, गृहरक्षक दलाचे समादेशक अधिकारी सागरकुमार थेरे, संध्या थेरे, होमगार्ड मंगेश परतेकी, अजय काळे, राजेश वाहने, तलांजी, राजगुरू, जाधव, काँग्रेसचे रामु राठी, नितीन आष्टीकर, शहरातील समाजीक कार्यकर्ते व नागरिकांनी आग विझविण्याकरीता व दुकानातील माल बाहेर काढण्याकरीता मदत केली. या आगीत दुकानदाराचे लाखो रुपयाचा नुकसान झाल्याचा प्राथमीक अंदाज आहे.

पोलीस पुढील तपास ठाणदार सतिश डेहणकर यांच्या मार्गदर्शनात निरज लोही हे करीत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button