माजी विध्यार्थ्यांने दिला शाळेला ग्रीन बोर्ड तर, बोर्डाच्या परिक्षेत चांगली कामगीरी करणाऱ्या विध्यार्थ्यांना पाच हजाराचे पारितोषक

गोवींदराव काकडे यांचा सत्कार करतांना मुख्याध्यापीका
आर्वी,दि.८:- चिंचोली (डांगे) येथील कै. नारायणराव वाघ विध्यालयाच्या माजी विध्यार्थ्याने शिकवीण्याची सोय व्हावी याकरीता शाळेला दोन ग्रीन बोर्ड दिले तर, येत्या बोर्डाच्या परिक्षेत गुणानुक्रमे प्रथम, व्दितीय व तृतीय श्रेणीत उत्तीर्ण होणाऱ्या विध्यार्थ्यांना प्रत्येक पाच हजार रुपयाचे पारितोषीक देवुन त्याचा सन्मान करणार आहे.
सागर बाजड असे शाळा व विध्यार्थ्यांविषयी आपुलकी जपणाऱ्या माजी विध्यार्थ्याचे नाव आहे. इयत्ता ५ ते १० पर्यंतचे शिक्षण या शाळेतून घेतले सन २००६ मध्ये दहावी उत्तीर्ण झाला. व सध्या पॉलिटेक्निक कॉलेज पुणे येथे कार्यशाळा निदेशक या पदावर तो कार्यरत आहे.
आपण ज्या शाळेत शिकलो आणी जगासमोर ताठ मानेने जिवन जगत आहो त्या शाळेचे ऋण फेडल्या गेल पाहिजे अशी भावना या मागची आहे. आपण ज्या प्रमाणे शिकूण पुढे गेलो त्याच प्रमाणे आपल्या शाळेतील विध्यार्थ्यांमध्ये शैक्षणीक आपुलकी वाढावी. त्यांच्यात जास्तीत जास्त गुण मिळवीण्याकरीता स्पर्धा निर्माण व्हावी आणी समाजा पुढे एक आदर्श निर्माण करावा या भावनेतुन बोर्डाच्या परिक्षेत गुणानुक्रमे प्रथम, व्दितीय व तृतीय श्रेणीत उर्त्तीण होणाऱ्या विध्यार्थ्यांना परितोषीक देण्याचा संकल्प करण्यामागचा त्याचा उद्देश आहे. त्यांनी शाळेचे शिक्षक गोविंद सावरकर यांचे जवळ आपली भावना बोलून दाखविली त्याला मुर्तरुप प्राप्त झाले. या उपक्रमामुळे समाजात चांगला संदेश पोहचणार असुन विध्यार्थी सुध्दा अभ्यासाकडे लक्ष केंद्रीत करण्यासाठी प्रवृत्त होणार असल्याने याचे सर्वस्तरावरुन स्वागत केल्या जात आहे.
शाळेच्या सांस्कृतीक कार्यक्रम प्रसंगी सागर बाजड यांचे आजोबा विष्णुजी काकडे यांचे मुख्याध्यापिका कु. गीता सुर्यवंशी यांनी शाल व श्रीफळ देवुन सत्कार केला. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा प्रभाताई गांडोळे, शिक्षक निलेश गांडोळे, सेवानिवृत्त शिक्षक प्रमोद येडाखे, श्रीराम कडू, गजेंद्र बिजवे, गोविंद सावरकर, किसना जाधव, नरेश गोंदाणे, रवींद्र हिवाळे, सुरेश काळे तसेच गावकरी, विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.