Maharashtraपोलीस कारवाईमहिला विशेष

वाहतुक सुरळीत करण्याकरीता पोलीसांनी कसली कंबर विध्यार्थींना सुध्दा केले मार्गदर्शन तर, १९ वाहन चालकावर केली कारवाई

रोड रोमीओंवर होणार कारवाई, दामीनी पथकाची निर्मीती, ९५५२५३०११२ या मोबाईल क्रमांकावर करता येणार तक्रार

     आर्वी,दि.२२:- रस्त्याच्या कामामुळे विस्कळीत झालेली वाहतुक सुरळीत करण्याकरीता येथील पोलसांनी कंबर कसली असुन १९ वाहन चालकांवर कारवाई केली आहे तर, शाळकरी विध्यार्थ्यीनींना सुध्दा पास्को कायद्याची माहिती देवुन मार्गदर्शन केले आहे. हि कारवाई बुधवारी (ता.२२) करण्यात आली.

येथील मध्यवस्तीमधुन जात असलेल्या तळेगाव (शा.पं.) पुलगाव महामार्गाच्या सिमेंटीकरणाचे काम सुरू असुन जुन्या न्यायालय परिसरापासुन तर  बस स्थानका पर्यंत एक तर्फी वाहतुक सुरू आहे. मात्र वाहन धारक आपली वाहने आधीच अवरुध्द असलेल्या रस्त्यांच्याकडेला उभी ठेवत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. अनेक वेळा जाम सुध्दा बसतो. याची दखल येथील पोलीसांनी घेतली असुन वाहतुक सुरळीत करण्याकरीता बुधवारी (ता.२२) १९ वाहन धारकांवर कारवाई केली आहे.

तर, दुसरीकडे पोलीस पथकाने बस स्थानक गाठले आणी येथे उपस्थीत असलेल्या शाळकरी, महाविध्यालयीन मुलींना पोलीस निरीक्षक यशवंत सोलसे यांनी पास्को कायद्याची सवीस्तर माहिती देवुन तुमच्या सुरक्षेकरीता दामीनी पथक निर्माण करण्यात आल्याचे सांगीतले तसेच वेगाने वाहन चालवील्यास नागरिकांच्या व वाहन चालकाच्या जिवीताला हानी पोहचते याची जाण ठेवून वाहने हळु चालवीण्याच्या सुचना वाहन धारकांना केल्या अन्यथा कडक कारवाई करण्यात येईल्‍ असे सांगीतले.

  यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद मदन यांनी मार्गदर्शन करतांना, येथील शाळा महाविध्यालयात शिक्षण घेण्याकरीता ग्रामीण भागामधुन मोठ्या प्रमाणात मुली येतात असे सांगून, अनेक मुली बस स्थानकावरुन पायदळ निघतात. यावेळी काही समाजकंटक रोडरोमीओ त्यांची छेड काढतात, अश्लील कॉमेंट करुन त्यांना त्रास देतात मात्र भिती पोटी यांची तक्रार पालकांकडे केल्या जात नाही अशा काही घटना घडल्यास याची सुचना मोबाईल क्रमांक ९५५२५३०११२ वर संपर्क साधुन द्या, तक्रारदाराचे नाव गुप्त ठेवुन त्वरीत कारवाई करण्यात येईल अशी माहिती दिली.

वर्धा जिल्हा पोलीस अधिक्षक अनुराग जैन, येथील उपविभागीय पोलीस अधिकारी देवराव खंडेराव यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार यशवंत सोलसे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद मदन, पोलीस उपनिरीक्षक संतोष चव्हाण, संदिप चव्हाण, पोलीस हवालदार इंगळे, कासदेकर, पोलीस नायक उईके तथा पोलीस कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे हि कारवाई केली  यामुळे विध्यार्थींनींना सुरक्षेची हमी मिळाली आहे तर, वाहन चालकांना धडकी बसली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button