सी-डेट एक्सप्लोझीव्ह कंपनी व इंडियन रेडक्रास संस्थेचयावतीने गर्भाशयमुख कर्करोग प्रतिबंधात्मक शिबीराचे आयोजन
९ ते १४ वयोगटातील २०० मुलींनी घेतला लाभ- योग्य प्रभावाकरीता दुसरा डोज घेणे गरजेचे – डॉ. अरुण पावडे

आर्वी,दि.१२:- गर्भाशयमुख कर्करोगाला भारतातील महिला मोठ्याप्रमाणात बळी पडत आहे. यावर मात करण्याकरीता शास्त्रज्ञांनी एचपीव्हि हि लस शोधुन काढली आहे. हि लस तळेगाव (शा.पं.) येथील सि-डेट कंपनीने उपलब्ध करुन दिली असून त्याचे लसीकरण इंडियन रेडक्रास संस्थेच्या माध्यमातुन स्थानीक पावडे नर्सिंग होम परिसरात शनिवारी (ता.११) व रवीवार (ता.१२) घेण्यात आलेल्या शिबीरात करण्यात आले. या शिबीराचे उद्घाटन सि-डेट कंपनीच्या डिजीएम पृथा राठी यांच्या हस्ते झाले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष येथील उपविभागीय अधिकारी विश्वास सिरसाट हे होते. तर, सि-डेट कंपनीचे डायरेक्टर ऑपरेशन कृष्णाजी, मॅनेजर अश्विनी बिलवाळकर, इंडियन रेडक्रास संस्थेचे संस्थापक व प्रसिध्द हृदयरोग तज्ञ डॉ. अरुण पावडे, ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयाचे वैध्यकीय अधिक्षक डॉ. पुष्पक खवशी, इंडियन रेडक्रास संस्थेचे सचिव डॉ. अभिलाष धरमठोक, उपाध्यक्ष राजाभाऊ तेलरांधे, कोषाध्यक्ष रवी शहा हे प्रमुख अतिथी होते.
यावेळी पृथा राठी यांनी मार्गदर्शन करतांना, महीलांमधील गर्भाशयमुख कर्क रोगावर मात करणारी एचपीव्ही ही लस सि-डेट कंपनीने उपलब्ध करुन दिली असली तरी याचे लसीकरण करणे महत्वाचे होते ते डॉ. अरुण पावडे यांच्या प्रयत्नाने इंडियन रेडक्रास संस्थेने घेतलेल्या शिबीराच्या माध्यमातुन सफल करता आले असे सांगून आभार मानले.
डॉ. अरुण पावडे यांनी मार्गदर्शन करतांना, भारतात कोट्यावधी महिला गर्भाशयमुख कर्करोगाने मृत्यु मुखी पडत असल्याचे सांगून, प्रत्येक सेकंदाला एक महिला याचा बळी ठरत असल्याची माहिती दिली. यावर मात करण्याकरीता वैध्यकीय शास्त्रज्ञांनी एचपिव्ही लसीचा शोध लावला असल्याचे सांगीतले. हि लस ९ ते १४ वर्ष वयोगटातील मुलींनी घेतल्यास गर्भाशयमुख कर्क रोगच नाही तर, वात आदि रोगांवर सुध्दा मात करता येत असल्याने प्रत्येक मुलींनी लसीकरण करुन घेणे आवश्यक आहे सुचना दिली.
उपविभागीय अधिकारी विश्वास सिरसाट यांनी, सि-डेट कंपनी व इंडियन रेडक्रास संस्थेच्या या प्रयत्नाची प्रसंशाकरुन ज्यास्तीत जास्त मुलींच लसीकरण करण्याकडे लक्ष वेधल्या गेल पाहिजे अशी अपेक्षा वर्तवीली.
या शिबीरात बाल रोगतज्ञ डॉ. सचिन हिवसे व डॉ. भुषण होले यांनी ९ ते १४ वयोगटातील शिबीरार्थी मुलींचे लसीकरण केले. सि-डेट कंपनीचे व्यवस्थापक रघुवीर पैठणकर उमेश साठवणे अनिल भट यांनी लस उपलब्ध करुन देवून त्याची नोंद घेतली. तर, डॉ. अविनाश लव्हाळे यांनी सुध्दा या शिबीराला भेट दिली.
या कार्यक्रमाला इंडियन रेडक्रास संस्थेचे ॲङ विनोद देशपांडे, अनिल भट, नंदकिशोर दिक्षीत, नवलकिशोर अग्रवाल, डॉ. प्रतिभा पावडे, ॲड. अरुणाताई देशपांडे, अरुण ढोक, प्रा रमेश जंवजाळ, भाटीजी, सुभाष वऱ्हेकर, सुरेश कान्हे, डॉ. प्रकाश चोरे, डॉ. वैभव अग्रवाल, डॉ. प्रकाश धांदे, डॉ देवेन्द्र खंडेलवाल, डॉ बुधवानी, डॉ उमेश गुल्हाने,डॉ विनय देशपांडे, प्रमोद पाटणी, श्रीकांत कलोडे, लक्ष्मणराव आगरकर, किशोर चोरडिया, प्रा अभय दर्भे, प्रेम सिंग राठोड, सुशील लाठीवाला, दिनेश चोरडिया, मोहन चांडक, विनय चोरडिया, जाकीर हुसेन, अनिश चोरडिया, संदीप बुधवानी, प्राजक कसर यांनी प्रामुख्याने उपस्थीत राहुन शिबीरार्थींची नोंद घेणे, लसीकरण करणे आदि कामात मदत केली.
कार्यक्रमाची प्रस्तावना डॉ. अभिलाष धरमठोक यांनी मांडतांना, इंडियन रेडक्रॉस संस्थेच्यावतीने करण्यात आलेल्या सामाजीक कार्याचा आढावा सादर केला, आणी गर्भाशयमुख कर्क रोगावर मात करण्याकरीता जास्तीजासत मुलींचे लसीकरण करण्याकरीता प्रयत्नरत राहु असे सांगीतले.
कार्यक्रमाचे संचालन डॉ.प्रा.अविनाश कदम यांनी केले तर, आभार डॉ भूषण अग्रवाल यांनी मानले.
योग्य प्रभावाकरीता दुसरा डोज घेणे गरजेचे – डॉ. अरुण पावडे
गर्भाशयमुख कर्क रोगावर मात करण्याकरीता एचपिव्ही हि लस फार प्रभावकारी ठरते. या लसीचा पहिला डोज घेतला असला तरी, सहा महिण्यानंतर दुसरा डोज घेणे आवश्यक आहे. जर दुसरा डोज घेतला नाही तर पहिल्या डोजचा काहीच उपयोग होणार नाही. हि लस गर्भाशयमुख कर्क रोगा बरोबरच, तोंडाचा कर्क रोग, वात आदि आजारावर मात करण्याकरीता उपयुक्त आहे. याचा उपयोग मुलांकरीता सुध्दा होवू शकतो अशी माहिती डॉ. अरुण पावडे यांनी यावेळी दिली.