नगर परिषद कनिष्ठ विज्ञान महावीध्यालयातील बारावीच्या विध्यार्थ्यांचा निरोप समारंभ
मेहनत, परिश्रम करुनच ध्येय्य निश्चित करा आणी विध्यालयाचाच नव्हे तर देशाच नाव उज्वल करा – डॉ. किरण सुकलवाड

आर्वी,दि.२१:- कठोर परिश्रम आणी मेहनत घेवुनच आपले ध्येय्य गाठण्याचा प्रयत्न करा आणी विध्यालयाचाच नव्ह तर, देशाच नाव उज्जवल करा असा संदेश देवुन नगरपरिषद कडून जी काही मदत होत असेल ती करण्याच्या आश्वासन येथील नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. किरण सुकलवाड यांनी येथे मार्गदर्शन करतांना दिले.
स्थानिक नगर परिषद कनिष्ठ विज्ञान महाविध्यालयातील बारावीच्या विध्यार्थ्यांना निरोप देण्याकरीता सोमवारी (ता.२०) ११ वी च्या विध्यार्थ्यांनी निरोप समारंभाचे आयोजन केले होते. यावेळी ते अध्यक्षीय मार्गदर्शन करीत होते.
प्रसिध्द हृदय रोग तज्ञ डॉ. अरुण पावडे, बि. आर. दापुरकर, व्ही. टी. गायधने, प्राचार्य विश्वेश्वर पायले, पर्यवेक्षीका कु. ज्योती अजमीरे हे या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी होते.
यावेळी डॉ. अरुण पावडे यांनी मार्गदर्शन करतांना, ५५ वर्षा पुर्वी या शाळेचा विध्यार्थी होतो अशी आठवण करुन देवून शिक्षण घेतांनाचे आलेले अनुभव कथन केले. माजी मुख्याध्यापक बि. आर. दापुरकर, व्हि. टी गायधने यांनी सुध्दा आपले अनुभव सांगुन विध्यार्थ्यांना प्रोत्साहीत करण्याचा प्रयत्न केला. प्राचार्य पायले यांनी शाळेविषयीची संपुर्ण माहिती दिली. तर, विध्यार्थ्यांनी सुध्दा आपले मनोगत व्यक्त करतांना शिक्षण घेत असतांना प्राध्यापकांकडून मिळालेल्या सहकार्याची माहिती दिली.
एनसीसी पायलट कु. इशिका मेहेरकुरे आणि कु. आकांक्षा चव्हाण यांनी पाहुण्यांना सन्मानाने समारंभ स्थळी आनले. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पुजन करुन कार्यक्रमाला सुरूवात झाली. यावेळी विध्यार्थ्यांनी कॉपीमुक्त अभियानाची शपथ घेतली. शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देवुन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. बारावीच्या विध्यार्थ्यांना लेखी परिक्षेकरीता नवीन एक्झाम्पल रायटिंग देण्यात आले.
कार्यक्रमाची प्रस्तावना, प्रा. नितीन बोडखे यांनी मांडली. धनश्री राऊत, चंचल टोकसे, हिमानी भालचक्र व राणी आखतकर यांनी सामुहिकरित्या संचालन केले तर, ११ वी चा विद्यार्थी आदर्श खोब्रागडे याने आभार मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीत्तेकरीता विध्यार्थ्यी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आदिंनी उपस्थित राहुन परिश्रम घेतले.