मातंग समाजाच्या बिपीएल धारकांची नावे यादीमधुन गहाळ गत २५ वर्षा पासुन लाभार्थी शासकीय योजने पासुन वंचीत,
जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करा, समाज भुषण तथा राष्ट्रीय लहू शक्ती संघटनेची मागणी

आर्वी,दि.२१:- तालुक्याच्या मोरांगणा (खरांगणा) येथील मातंग समाजाच्या बिपीलएल धारकांची नावे यादी मधुन गहाळ केली गेली असल्याने गत २५ वर्षा पासुन ते शासकीय लाभा पासुन वंचीत राहत आहे या करीता जबाबदार असलेल्या अधिकारी, कर्मचारी व समाजसेवकांवर कारवाई करुन न्याय द्याव अशी मागणी समाज भुषण तथा राष्ट्रीय लहु शक्ती संघटनेची असुन त्यांनी सरचिटीणीस राजेश अहीव यांच्या नेतृत्वा येथील तहसीलदार हरिष काळे व गटविकास अधिकारी यांना निेवेदन दिले आहे.
शासनाच्या प्रथम पाहिणी प्रमाणे तालुक्यातील मोरांगना ( खरांगणा) येथील अनुसूचित जमाती प्रवर्गातील मातंग समाजाच्या नागरिकांना दारिद्र रेषे खाली येत असल्याचे प्रमाण पत्र बहाल करण्यात आले होते. शिवाय शासकीय योजनेचा लाभ सुध्दा त्यांना मिळत होता. काही काळा नंतर त्यांची नावे यादी मधून गहाळ करण्यात आली, परिणामी गत २५ वर्षा पासुन त्यांना शासकीय योजनेच्या लाभा पासुन वंचीत राहावे लागत आहे. सीधा पत्रीकेवरील धान्य असो, वैद्यकिय सेवा असो अथवा इतर लाभा पासुन त्यांना वंचीत ठेवल्या जात आहे. या बाबत ग्राम पंचायत , पंचायत समीती आदि कार्यालयात विचारणा केली मात्र त्यांना अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे मिळाले. परिणामी येथील समाज भुषण तथा राष्ट्रीय लहु शक्ती संघटनेने पुढाकार घेतला आणी तहसीलदार हरिष काळे व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी निवेदन देवुन जबाबदार अधिकारी, कर्मचारी, समाजसेवक आदिंवर कारवाई करा आणी वंचीतांचा पुर्वी प्रमाणे दारिद्र रेषे खालील यादी समावेश करा अशी मागणी करण्यात आली.
निवेदन देणाऱ्यांमध्ये सरचिटणीस राजेश अहीव, उपाध्यक्ष सुधाकर वाघमारे, खरांगना सर्कल प्रमुख हरीचंद्र वानखेडे, बबन वानखेडे, पुंडलिक वानखेडे, दिवाकर, अशोक वानखेडे, वामन कासारे, राजू ढोके, कमलाबाई वानखेडे, ननिबाई वानखेडे, सुरेंद्र, महेंद्र, प्रकाश, मनोज, रवींद्र, रमेश वानखेडे आदींचा समावेश आहे.