गांधीविध्यालयाच्या विध्यार्थ्यांनी ऐतीहासीक व धार्मीक स्थळांना दिल्या भेटी
जाणुन घेतला इतिहास व पाहिला पौराणीक कलाअविश्कार

आर्वी,दि.६ :- स्थानीक गांधी विध्यालयाच्या विध्यार्थ्यांनी चार दिवसाच्या शैक्षणीक प्रवास दौऱ्यात महाराष्ट्रात फिरून ठिकठिकाणाच्या ऐतीहासीक व धार्मीक स्थळांना दिलेल्या भेटीत जाणुन घेतला हजारो वर्षा पुर्वीचा इतिहास आणी पौराणीक कला अविश्काराची घेतली माहिती.
नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसी बुधवारी (ता.एक) येथील गांधीविध्यालयाच्या विध्यार्थ्यांचा अभ्यास दौरा सुरू झाला. सर्व प्रथम त्यांनी प्रसिध्द धार्मीक स्थळ शेगाव येथील गजानन महाराजांच्या समाधीचे, महानुभाव पंथाच्या जाळीचादेव यांचे दर्शन घेतले. त्यानंतर जागतीक वारसा असलेल्या अजींठा येथील लेण्यांची पाहणी करुन इतीहास जाणुन घेतला, आणी खुलताबाद कडे प्रस्थान केले. येथील भद्रा मारोतीचे दर्शन घेवून औरंगजेब यांच्या समाधीची माहिती जाणुन घेतली. वेरुळ येथील बारा ज्योतीर्लींगापैकी एक असलेल्या धृष्णेश्वर मंदिराला भेट देवुन दर्शन घेतले आणी वेरुळची लेणी व कैलास मंदिरांच्या निर्मीतीची माहिती घेतली. लगतच्या दौलताबादच्या ऐतीहासीक किल्ल्याची पाहणी करुन संरक्षणाकरीता वापरल्यागेलेल्या युक्तींची माहिती जाणुन घेतली, याशिवाय विध्यार्थी ट्रैकींग करीत सर्वात उंचावर असलेल्या तोफ पर्यंत पोहचले. त्याची मारक शमता व उपयोगीता समजुन घेतली. यानंतर संभाजी नगर मधील बीबी का मकबरा, पवनचक्की आदिंमागचा इतीहास व माहिती गाईडच्या माध्यमातुन जाणुन घेतली. तर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विध्यापीठाला भेट देवून ऐतीहासीक संग्रहालयाची पाहणी करुन सिध्दार्थ गार्डनचा आनंद घेतला. येथील म्युझियम मधुन हैद्राबाद संस्थानाचे भारतात विलीनीकर कसे झाले याची सचीत्र माहिती जाणुन घेतली मच्छालयात जावुन विविध प्रकारच्या माशाची पाहणी केली. चार दिवसाच्या या अभ्यास दौऱ्यात विध्यार्थ्यांनी महाराष्ट्रातील एैतीहासीक धरोवरची माहिती घेवुन सामाजीक व धार्मीक ऐकोपा कसा कायम ठेवता येईल् याचे सुध्दा धडे घेतले.
८० विध्यार्थ्यांच्या या अभ्यास दौऱ्यात गांधी विध्यालयाचे शिक्षक संजय कीटे, टि.के देशमुख, माला खूने, वर्षा बेदी, नावेद गणी, विजय जवादे, एन. बी. कदम, मृदुल जाणे, हर्षदा कडू, प्रमोद नागरे आदिंनी सोबत केली.
या अभ्यास दौऱ्यामधुन विध्यार्थ्यांनी कोणते धडे घेतले व त्यांना आलेला अनुभव याची माहिती घेण्याकरीता स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती प्राचार्य विश्वेश्वर पायले व पर्यवेक्षिका ज्योती अजमिरे यांनी दिली
.