Uncategorized

विज्ञानाच्या युगात कल्पकबुध्दीचे व जिज्ञासु वृतीचे तरुण घडवीणे गरजेचे -आमदार सुमीत वानखेडे-

उत्कृष्ठ मॉडेल प्रदर्शीत करणाऱ्या शाळेला पाच लाखाची निधी आमदार फंडातुन देणार, कृषक कन्या शाळेत विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन, २०९ शाळेंचा सहभाग

आर्वी,दि.१४:- विज्ञानामुळे सामाजीक जिवनात अनेक बदल घडले असुन जागतीक स्तरावरील प्रगतीच्या स्पर्धेत टिकायचे असेल तर, या विज्ञानाच्या युगात शिक्षणाच्या माध्यमातुन शिक्षकांनी कल्पक बुध्दीचे व जिज्ञासु वृतीचे तरुण घडवीण्याकरीता लक्ष केंद्रीत केल्या पाहिजे अशी अपेक्षा आमदार सुमीत वानखेडे यांनी व्यक्त करुन उत्कृष्ठ मॉडेल सादर करणाऱ्या शाळेला आमदार फंडामधुन पाच लाख रुपयाचा निधी देण्याची घोषणा केली.

आर्वी पंचायत समीतीच्या माध्यमातुन येथील कृषक कन्या विध्यालयात आयोजीत केलेल्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे त्यांच्या हस्ते उद्घाटन शुक्रवारी (ता.१३) करण्यात आले या प्रसंगी ते मार्गदर्शन करीत होते.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष कृषक शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष संदिप काळे हे होते. तर, पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी सुनिताताई मरस्‍कोल्हे, गटशिक्षणाधिकारी सुरेश पारडे, शिक्षण विस्तार अधिकारी पदमाताई तायडे, मुख्याध्यापिका सौ.अनधा कदम, पदमजा देशमुख,  वाळके मँडम, केन्द्र प्रमुख संजय कोहचाडे, प्रमोद पांडे, विलास तराळे, विजय लोणारे हे या कार्यक्रमाचे प्रमुख अतीथी होते.

पुढे मार्गदर्शन करतांना त्यांनी, विज्ञान हे मानवाच्या जिवनातील शास्वत विकासाचे एक साधन  असल्याचे सांगून देशाची खऱ्या अर्थाने प्रगती साधायची असेल तर देशात उच्चकोटीचे तरुण वैज्ञानीक  घडवीण्याकरीता शिक्षकांचे प्रयत्न असावयास पाहिजे अशी अपेक्षा वर्तवीली. विज्ञान प्रदर्शनीच्या माध्यमातुन विध्यार्थ्यांना आपल्या कल्पक बुध्दीचा विस्तार करण्याची एक संधी मिळते आणी त्यांच्यातील सुप्त गुण जागृत होतात. यातुनचा उध्याचा वैज्ञानीक तयार होण्याची प्रक्रीया सुरू होत असल्याने जास्तीतजास्त प्रमाणत विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन केल्या गेले पाहिजे अशी सुचना सुध्दा त्यांनी यावेळी दिली.

या विज्ञान प्रदर्शनी मध्ये सहभागी झालेल्या तालुक्यातील २०९ शाळेतील विध्यार्थ्यांनी मानवाच्या भविष्यातील गरजांचा विचार करुन आपआपल्या कल्पक बध्दीने तयार केलेल्या सुंदर अश्या प्रतीकृती सादर केलेल्या आहेत.

कार्यक्रमाची प्रस्तावना, सौ. अनधा कदम यांनी मांडली, सचंलन आशीष देशमुख यांनी केले  तर आभार  सौ. वनश्री कडू यांनी मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वीत्तेकरीता मनोहर पचारे, अनंत भामकर, निता राऊत, मंजुषा राऊत, उमेश फुलबंरकर, राकेश ढोले, दिनेश शेळके, योगिता जत्तेवार, वनश्री कडू, उज्वला झटाले, प्रमिला वरकडे, मंगला बेलसरे, संगिता तेलगोटे, महेश ढवळे, लक्ष्मण शेळके, मनोज गाडेकर, संतोष खांडेकर, मारोती ओंकार, ज्योत्सना चारडे, ऋतूजा टोपले, कोमल पवार, योगिता कोटेवार, संध्याताई पायले, दयमंती भोंगाडे, सचिन खोडके, मिलिंद आसोडे, सरताज पठाण, सचिन टरके, देविता पाटणे, सुनिता राजनेकर, मंगेश कठाणे, सुनील शंभरकर, उज्वला अभिलकर, आदिंनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button