तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीत वाढोणा शाळेने पटकावीला प्रथम क्रमांक
कोयल राठोड व तुलसी चव्हाण यांची प्रतीकृती जिल्हास्तरावर

आर्वी,दि.१५:- स्थानिक कृषक कन्या शाळेत झालेल्या तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनीत सहभागी झालेल्या वाढोणा येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेने प्रथम क्रमांक पटकावीला असल्याने त्यांचे सर्वस्तरावर कौतूक केल्या जात आहे.
वाढोणा शाळेच्या चौथ्या वर्गातील विध्यार्थीनी कु. परिणीता चिंतामण डोंगरे व खुशाली राजेंद्र मोकदम यांनी वर्ग शिक्षीका कु. भारती सानप यांच्या मार्गदर्शनात तयार केलेल्या “ट्रान्समिशन लाईन फॉल्ट डिटेक्शन विथ युजिंग सेंसर” हा प्रोजेक्ट विज्ञान प्रदर्शनीत ठेवुन अतीशय सुंदर रित्या त्याचे सादरीकरण केले होते.
त्यांच्या या यशा बद्दल गट शिक्षणाधिकारी सुरेश पारडे, केंद्र प्रमुख संजय कोचाडे, मुख्याध्यापक उमेश केळुत, शिक्षक कु. प्रज्ञा बागेसर, अमित खुने, योगेश बोबडे, तथा शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी सदस्य व पालक वर्गांनी शुभेच्छा देवून त्यांचे कौतुक केले.
कोयल राठोड व तुलसी चव्हाण यांची प्रतीकृती जिल्हास्तरावर
बोथली (की.) येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमीक शाळेचे शिक्षक मारोती विरुळकर यांच्या मार्गदर्शनात कोयल राठोड व तुलसी चव्हाण या विध्यार्थ्यांनी तयार केलेले प्रोजेक्ट, शैक्षणीक साहित्य निर्मीती व विध्यार्थी विज्ञान प्रतिकृती या दोन्ही गटा मधुन उत्कृष्ठ ठरल्यामुळे प्रथम क्रमांक तर पटकावीलाच शिवाय त्यांच्या या प्रोजेक्टची निवड जिल्हस्तराकरीता करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील या विध्यार्थ्यांनी घेतलेल्या भरारीचे सर्व स्तरावरुन अभिनंदन केल्या जात आहे.