सुमीत वानखेडे आमदार होताच, अनेकांना पडू लागले स्वप्न विधान परिषदेवर अथवा शासनातील भरीव जबाबदारीच्या पदावर नियुक्ती करण्याकरीता मागणी
अनेकांना याची माहितीच नाही, पँन्ट नाही तर लंगोटीही सही

आर्वी,दि.२७:- सुमीत वानखेडे आमदार होताच अनेकांना मोठमोठ्या पदाची स्वप्ने पडू लागली असुन भाजपच्या दोन कार्यकर्त्यांकरीता त्यांच्या पाठीराख्यांनी विधान परिषदची जागा मागीतली आहे, जर ती मिळाली नाही तर शासनातील भरीव जबाबदारीचे पद मिळावे याकरीता प्रयत्न चालवीले असुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी करण्याची जोरदार तयारी सुरू केली आहे. या करीता जिल्ह्यातील भाजपच्या एका मोठ्या पदाधिकाऱ्याची फुस असल्याची सुध्दा जोरदार चर्चा आहे.
आपला माणुस म्हणून ज्यांची ख्याती आहे असे समाजीक कार्यकर्ते सुधीर दिवे व विधानसभा क्षेत्रात भाजपची पाळेमुळे रोवणारे माजी आमदार दादाराव केचे तसेच माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा भाजपच्या प्रदेश महासचीव सरिता विजय गाखरे यांची विधान परिषद सदस्य पदाकरीता मजबूत दावेदारी असतांनाच या स्पर्धेत भाजपचे पदाधिकारी विजय बाजपेयी व सहकार क्षेत्रातील युवा नेतृत्व संदिप काळे हे सुध्दा उतरलेले आहे. त्यांनी आमदार सुमीत वानखेडे यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदन पाठवीण्याची तयारी सुरू केली आहे. आपल्या पाठीराख्यांच्या माध्यमातून मागणी पत्र सुध्दा दिल्याचे कळते.
पक्षात मिळवीलेल्या जबाबादारीच्या व नगर परिषदेत उपभोगलेल्या पदाच्या तथा शासकीय समीतीत मिळालेल्या पदाच्या जोरावर विजय बाजपेयी यांना विधान परिषदेवर घेण्याची अथवा महामंडळावर नियुक्ती करण्याची मागणी त्यांच्या पाठीराख्यांनी केली आहे. यात भाजपचे वर्धा जिल्हा महासचिव अविनाश देव, शहर अध्यक्ष राहुल गोडबोले, ग्रामीण अध्यक्ष प्रशात वानखेडे, कमलाकर निभोंरकर, चक्रधर डोंगरे, ॲङ मनिष ठोंबरे, दिलीप जसुतकर, निलेश देशमुख, सचिन होले, प्रशांत ठाकुर, जगन गाठे, संजय थोरात, मुकूंद बारंगे, राजू पावडे, अश्विन शेंडे, अशोक निकम, संजय पोहेकर, जयंत नेपटे, राजेंद्र ठाकरे, प्रशांत काकपुरे, राजेश ठाकरे, गुणवंत नरांगे, भाऊ खवशी, हरिभाऊ धोटे, निताताई गजाम, विजय गाखरे, राजू मानकर, रोषण चौधरी, अनिरुध्द दंडाळे, नितीन मेश्राम, संजय राऊत, कैलास गळहाट, सौ. उषाताई सोनटक्के, सौ. सारिका लोखंडे, अब्दुल कय्युम, सुनिल बाजपेयी, अजय कटकमवार, हर्षल पांडे, प्रकाश गुल्हाणे, राहुल अग्रवाल, विपीन अग्रवाल, प्रकाश सातरोटे, राजाभाऊ वानखेडे, अनिरुध्द होणाडे, मनोज कसर, सागर निर्मळ, सौ. तृप्ती पावडे, सौ. अंकीता होले, राजाभाऊ कदम आदिंची नावे आहेत
तर दुसरीकडे सहकार क्षेत्रातील व शैक्षणीक क्षेत्रातील कामगिरीच्या जोरावर संदिप काळे यांची विधान परिषदेवर अथवा सहकार क्षेत्रातील मोठ्या जबाबदारीच्या पदावर नियुक्ती करावी अशी मागणी त्यांच्या पाठीराख्या देवेंद्र बोके, मधुकर चौकोणे, धर्मेंद्र राऊत, लखनकुमार अग्रवाल, प्रज्वल कांडलकर, बाळा सोनटक्के, अब्दुल फहीम, विपीन अग्रवाल, सचिन होले, दिलीप जासुदकर, डॉ. दाभीरे, सौ. सारिका लोखंडे, सौ. उषाताई सोनटक्के, गंगाधर काळे, धिरज कसर, शिरीष महल्ले, विजयराव गुल्हाणे, मुकेश अवथळे, तनुज काळे, चेतन जगदाळे, उमेश घोडखांदे, दिपक भोंबे, प्रमोद सोनटक्के, निलेश गवारले, गजानन जवळेकर, सुधाकर सातपुते, गुणवंत मांजरखेडे, भैय्यासाहेब भालेराव, श्याम सरोदे, संजय खराडे, योगेश डोरलीकर, पी.जी. काकडे, महादेवराव भाकरे, दिलीप भुसारी यांनी केली असली तरी या ही निवेदनावर कुणाच्याही सह्या नाहीत.
अनेकांना याची माहितीच नाही
मागणी करणाऱ्या पाठिराख्यांपैकी काही लोकांसोबत संपर्क साधला असता त्यांनी याबाबत आम्हाला काहीच माहित नसल्याचे सांगून आम्ही त्यांचा मान राखतो याचा अर्थ आम्ही त्यांच्यासोबत कोणत्याही कामाकरीता आहो असा घेवु नये असे सांगीतीले.
पँन्ट नाही तर लंगोटीही सही
पाठीराख्यांनी विधान परिषद सदस्यपदा सोबतच मलीदा देणाऱ्या महामंडळाची मागणी केली असल्याने हा विषय मोठ्याप्रमाणत चर्चेचा ठरला आहे. आमच्या नेत्याला पँट जरी मिळाला नाही तरी लंगोटी मात्र मिळालीच पाहिजे अस ठोकुन बोलल्या जात आहे.