सरस्वती नगर मधील विहीर ठरणार अपघातास कारणीभुत नगर परिषदेचे दुर्लक्ष, जिवत हानी होण्याची शक्यता

आर्वी,दि.१७:- नगर परिषद प्रशासनाच्या दुर्लक्षीत असलेल्या चेरी लेआऊट लगतच्या स्वरस्वती नगर मधील खुल्या जागेत जमीनस्तरावरील विहीरीचे तोंड खुले असल्यामुळे यात पडून अपघात होवुन जिवीत हानी होण्याची दाट शक्यता आहे. मुख्याधिकारी डॉ किरण सुकलवाड याकडे लक्ष देतील का असा प्रश्न? नागरिकांचा आहे.
चेरी लेआऊट लगत नगर परिषदेची खुली जागा आहे. या जागेवर अर्धवट बांधलेली विहीर असुन तिचे तोंड जमीस्तराच्या खाली आहे. या विहीरी लगतच दत्ताचे व हनुमानजीचे मंदीर आहे. या मंदिरात अनेक भावीक देवदर्शनाला येतात याशिवाय मोकाट जनावारे सध्दा या परिसरात फिरतात. काही दिवसापुर्वी या विहीरीत गाय पडली होती. मात्र परिसरातील नागरिकांच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी केलेल्या प्रयत्नाने गायीला जिवदान मिळाले. पुढे अशा जिवावर बेतनऱ्या घडणा घडू नये या करीता नगर परिषदेने विहीरीचे तोंड बाधुन तिला जमीन स्तरापासुन दोन ते तिन फुट उंच करावे याशिवाय जाळी बसविण्यात यावी अशी मागणी नागरिकांची आहे.