सार्वजनीक माहिती

स्मृतीशेष व्टींकल निखाडे (मुळे) हिचा वाढदिवस अनोख्या पध्दतीने साजरा

सामान्य ज्ञान स्पर्धा व पाली भाषा प्रचार परिक्षेचे केले आयोजन

     आर्वी,दि.१७:- डॉ. प्रा. विजयाताई मुळे ह्या मुलगी स्मृतीशेष व्टिंकल हिच्या वाढदिवसाला विध्यार्थ्यांना प्रोत्साहन देणारे कार्यक्रम राबवुन आगळ्यावेगळ्या पध्दतीने साजरा करतात यावेळी सुध्दा त्यांनी सामान्य ज्ञान स्पर्धा व पाली भाषा प्रचार परिक्षेचे आयोजन करुन आपली परंपरा कायम ठेवली आहे.

संडे धम्म मिशनच्या सहभागाने रवीवारी (ता.१५) येथील आर्ट, कॉमस व विज्ञान महाविध्यालयात विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जिवन कार्य व बुध्द आणि त्यांचा धम्म या ग्रंथावर आधारीत सामान्य ज्ञान स्पर्धा घेण्यात आली. तथागत भगवान गौतम बुद्ध व परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व अभिवादन घेण्यात आलेल्या स्पर्धात परिषेत ६५ विध्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवीला.

हि स्पर्धा संडे धम्म मिशन चे नरेंद्र पखाले, अनिल खैरकार,  भीमरावजी मनव,. पंजाबराव कांबळे, प्रा. पंकज वाघमारे,  सहदेवराव भगत, प्रा. डॉ. अनिल दहाट, प्रा. डॉ. प्रवीण काळे, सिद्धार्थ शेंद्रे, प्रा. डॉ. विजया मुळे ,खंडारे यांच्या देखरेखीत पार पडली, परीक्षेच्या पुर्व तयारी करीता धम्म प्रचारक सुरेश भिवगडे, सुजित भिवगडे, निलेश गायकवार, प्रतीक मुडे यांनी परिश्रम घेतले. तर परिक्षेकरीता प्रा.डॉ. रवींद्र सोनटक्के यांनी जागा उपलब्ध करुन दिली.

तर, दुसरीकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरातील सिध्दार्थ बुध्द विहार मध्ये नागपुरच्या बुध्द विहार समन्वय समितीच्या मदतीने पाली प्रचार भाषा परिक्षेचे आयोजन करण्यात आले होते.

पाली भाषा ही तथागतांची भाषा होती तीच धम्माची भाषा आहे.तिला आता अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला आहे. हि भाषा टिकविण्याची जबाबदारी प्रचारकांनी घेतली आहे.  बुद्ध धम्माचा व भाषेचा प्रचार करणे साठी प्रत्येक प्रबुद्ध धम्म बांधवांनी ही परीक्षा देवून धम्म चळवळीला गतिमान करण्यासाठी पुढे आले पाहिजे  असे आव्हान आयोजकाच्यावतीने करण्यात आले होते.

घेण्यात आलेल्या पाली भाषा परिक्षेत  सिद्धांत जीवनराव ढाणके,  प्रज्ञा गिरीश नाखले इंदिरा सुखदेव निकाळजे, नम्रता दिगंबर बनकर, विजयता अरविंद नाखले,  बबीता रोशन तायवाडे, ऋषी प्रवीण अधव, किरण राजेश पाटील, शुभांगी विनोद बनसोड, सुरज घनश्याम मेहरे, चंदा अनिल खैरकार, सुहानी प्रमोद चौरपगार, दिपाली बंडू काळे, रोहित श्रीधर मेश्राम, प्रीती प्रवीण अधव, सचिन राजू मनवरे, नीलिमा अरविंद काळबांडे आदिंनी आपला सहभाग नोंदविला. तर, परीक्षा केंद्राची जबाबदारी अनिकेत भगत, रीना प्रमोद चौरपगार, भारती बनसोड व धम्म प्रचारक सुरेश भिवगडे यांनी सांभाळली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button