
हिंगणघाट,दि.१८:- सध्याच्या काळात रस्त्यावर केक कापुन अथवा मोठमोठ्या हॉटेल मध्ये जावुन थाटामाटात वाढदिवस साजरा करण्याची आधुनीक संस्कृती समाजात रुजली आहे. मात्र हिंगणघाट येथील एका शिक्षीकेने शाळेतच वाढदिवस साजरा करुन विध्यार्थ्यांसोबत असलेल्या ऋणानुबंधाचे पालन करीत एक आगळावेगळा परिचय करुन दिला.
शिक्षक आणी विध्यार्थ्यांच्या ऋणानुबधाचे पालन करणाऱ्या शिक्षीकेचे नाव प्रतिभा गुल्हाणे असे असुन, त्या हिंगणघाट पंचायत समीती अंतर्गत येत असलेल्या वाघोली केंद्रातील जिल्हा परिषद उच्च माध्यमीक शाळा जामणी येथे कार्यरत आहेत.
सोमवारी (ता.१६) छोट्या स्वरुपात झालेल्या या वाढदिवसाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक विलास हिंवज हे होते तर, दिनेश कावळे, भुषण सावळकर आदि शिक्षक प्रमुख अतीथी होते.
कार्यक्रमाचे संचालन चौथ्या वर्गातील विध्यार्थीनी कु. निधी दारोंडे हिने केले. तर, आभार तिसऱ्या वर्गातील विध्यार्थी कु. मनस्वी वाघमारे हिने मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तिसऱ्या व चौथ्या वर्गातील विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.