Uncategorized

रोटरी क्लब ऑफ कॉटन सिटी व संत अच्युत महाराज रुग्णालयाच्यावतीने

हृदय रोग निदान शिबीराचे आयोजन, २०१ रुग्णांनी घेतला लाभ

     आर्वी,दि.२९:- रोटरी क्लब ऑफ कॉटन सिटी व अमरावती येथील संत अच्युत महाराज रुग्णालयाच्या संयुक्त विध्यमाने येथील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात हृदय रोग निदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीराचे उद्घाटन आमदार सुमीत वानखेडे यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष अच्युत महाराज हृदय रोग रुग्णालयाचे उपाध्यक्ष सुधीर दिवे हे होते तर, प्राचार्य तथा सचिव सागर पासेबंद, उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयाचे वैध्यकीय अधीक्षक डॉ. पुष्पक खवशी, हृदय रोग तज्ञ डॉ. शिवराज शिंदे, डॉ. प्रशांत लहाने, डॉ. सुदेश दारव्हेकर, ज्योत्सना पवार, भारती पुनसे, संगीता मेश्राम, रोटरी क्लबचे अध्यक्ष उमेश भुसारी, सचीव सुनील बाजपेयी हे प्रमुख अतिथी होते.

यावेळी सुमीत वानखेडे यांनी मार्गदर्शन करतांना, माजी पंतप्रधान भारत रत्न अटलबिहारी बाजपेयी यांच्या जन्मदिनी रोटरी क्लबने घेतलेल्या या उपक्रमाची प्रसंशा केली आणी असे आरोग्य विषयक उपक्रम सातत्याने राबवील्या जावे अशी अपेक्षा व्यक्त केली जेणे करुन यामुळे नागरिकांना चांगली आरोग्य सुवीधा मिळण्यास मदत होईल्‍ अशी सुचना दिली.

सुधिर दिवे यांनी मार्गदर्शन करतांना, आर्वी, आष्टी, कारंजा परिसर हे श्री संत अच्युत महाराज यांची कर्मभूमी आहे. या परिसरात हृदय रोग होवूच नये असा प्रयत्न सामाजीक संस्थांच्यामाध्यमातुन केल्या जावा अपेक्षा वर्तवीली. आणी याकरीता लागणारी मदत केल्या जाईल्‍ तसेच हृदय रोगाच्या निदानाकरीता व उपचारकराकरीता सवलत सुध्दा दिल्या जाईल असे आश्वासन दिले.

प्राचार्य सागर पासेबंद म्हणाले की, श्री संत अच्युत महाराज हॉस्पिटल हे अमरावती जिल्ह्यात असले तरी हाकेच्या अंतरावर आहे. येथे २४ तास हृदयरोग तज्ञ सेवेत उपलब्ध असतात. या हॉस्पीटल मध्ये ६० हजारापेक्षा जास्त रुग्णांची शस्त्रक्रीया होवुन ते चांगले जिवन जगत आहे. १८ वर्षाच्या कार्यकाळात सर्वात जास्त शस्त्रक्रीया करुन अख्या महाराष्ट्रात सर्वात चांगली रुग्णसेवा करण्याचा मान या रुग्णलयाचा आहे. रुग्णालयात सर्व सुवीधा उपलब्ध असुन जलद सुवीधा मिळत असल्याने मराठवाडा, मध्यप्रदेश आदी परिसरातील रुग्ण सुध्दा उपचार घेण्याकरीता येथे येतात अशी माहिती दिली.

     या शिबीराचा लाभ २०१ रुग्णांनी घेतला असुन यापैकी १७० रुग्णांची ईसीजी तपासणी करण्यात आली तर, २५ रुग्णांना विशेष उपचाराकरीता श्री. संत अच्युत महाराज हृदय रोग रुग्णालयात पुढील तपासणी व उपचाराकरीता पाठवीण्यात आले.   

श्री संत अच्युत महाराज रुगणालयातील तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनात डॉ. प्रशांत लहाने, प्रज्ञा मनवर, प्राजक्ता वाडेकर, अंजना अंबोणे, अर्चना खांसबागे, सविता सायनारे, प्रिया छापानी, दामिनी मेश्राम, तसेच ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ पवार, डॉ पुनसरे आदिंनी शिबीरार्थीच्या तपासणीची प्रक्रिया राबवीली.

शिबीराच्या यशस्वीत्तेकरीता रोटरी क्लब ऑफ कॉटन सिटीचे पदाधिकारी सुशील लाठीवाला, संदीप मुळे, विजय अग्रवाल, मुन्ना चांडक, ललित संकलेचा, डॉ.उमेश गुल्हाने, डॉ.दिवाकर ठोंबरे, मनीष अग्रवाल, प्रवीण सूर्यवंशी, डॉ. विनय देशपांडे, राजेश कटियारी, नरेश करतारी, कैलाश मोटवानी, रवि साखरे, डॉ. प्रवीण देशमुख आदिंनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button