पुस्तकी ज्ञानासोबतच शारीरीक प्रशीक्षण देण्याकरीता शिक्षकांनी पुढाकार घेतला पाहिजे -आमदार सुमीत वानखेडे-
पाचोड (ठाकुर) येथे केंद्रीय क्रिडा व सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन

आर्वी,दि.१२:- भारतासारख्या विशाल देशातील विध्यार्थ्यांनी खेळाच्या स्पर्धेत हिरारिने भाग घेवुन आपले कौशल्य पणास लावले तर चांगले खेळाडू निर्माण होती आणी जागतीक स्तरावर चांगली कामगीरी करुन देशाचे ना उज्वल करु शकतील. मात्र या करीता शिक्षकांनी पुस्तकी ज्ञानाबरोबरच, शारीरिक प्रशीक्षण देण्याकरीता पुढाकार घेतला पाहिजे अशी अपेक्षा नवनिर्वाचीत आमदार सुमीत वानखेडे यांनी येथे व्यक्त केली
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पाचोड (ठाकुर) येथे आयोजित केलेल्या केंद्रीय क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे गुरुवारी (ता.१२) त्यांच्या हस्ते उदघाटक झाले या प्रसंगी ते मार्गदर्शन करीत होते.
पाचोड (ठाकुर) ग्रामपंचायतीच्या सरपंच्या सौ.निलीमाताई राठोड, शाळा समितीचे अध्यक्ष विनोद राठोड, उपाध्यक्ष दिलीप राठोड, उपसरपंच किशोर राठोड, अनुसया जाधव, सुधाकर राठोड, पोलीस पाटील चंदू पवार, कवलसिंग राठोड, किसना राठोड, संजय जाधव, सामाजिक कार्यकर्ते कैलास चव्हाण, गोवर्धन जाधव, भागचंद पवार हे या कार्यक्रमाचे प्रमुख अतीथी होते.
पुढे मार्गदर्शन करतांना त्यांनी, भारत देशाला सशक्त तरुणांची गरज असल्याचे सांगून पुस्तकी ज्ञानासोबतच मैदानी खेळाचे धडे विध्यार्थ्यांना देणे आवश्यक असल्याची अपेक्षा वर्तवीली. कारण, या माध्यमातुन प्रत्येक तरुणामध्ये खेळाडू वृत्ती रुजेल आणी विध्यार्थ्यांसोबतच देश सुध्दा विकासाच्या शिखरावर पोहचल्याशिवाय राहणार नाही अशी संभावना व्यक्त केली. याकरीता शिक्षकांनी सुध्दा पुढाकार घेतल्या पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करुन शाळेच्या गुणवत्ता वाढीकरीता व शैक्षणीक दर्जावाढीसाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
या प्रसंगी बेल्हारा शाळेच्या शिक्षिका आशाताई चौधरी यांनी कवीता गायन करुन आमदार सुमितभाऊ वानखेडे यांच्या दैदिप्यमान कामगिरी व प्रेमळ स्वभावाचा परिचय करुन दिला.
या उद्घाटन कार्यक्रमाची प्रस्तावना, चिंचोली (डांगे) केंद्राचे केंद्र प्रमुख विलास तराळे यांनी मांडली, संचालन पाचोड (ठाकुर) शाळेचे शिक्षक सारगंधर पासरे यांनी केले तर आभार, मुख्याध्यापक लक्ष्मणराव बोरवार यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता दिलीप बुट्टे, संजय जुनघरे, सुरज लोखंडे, सुशीलकुमार चव्हाण, कु.रजनी उंबरकर, आदी शिक्षकांनी मोलाचे सहकार्य केले. यावेळी चिंचोली केन्द्रातील संपूर्ण शाळेचे मुख्याध्यापक व सहाय्यक शिक्षक उपस्थित होते.