“मॅनेजमेंट गुरु” सुधीर दिवे यांना विधान परिषदेच्या माध्यमातुन संधी द्यावी
आर्वी विधानसभा क्षेत्रातील नागरीकांची मागणी, हिवाळी अधीवेशनात देणार मागणीचे निवेदन

आर्वी,दि.११:- यशस्वी नेतृत्व, राजकीय व सामाजीक दुरदृष्टी आणी समाजसेवा क्षेत्रात आदर्शस्थानी असलेल्या “ मॅनेजमेंट गुरू” सुधीर दिवे यांना रिक्त असलेल्या विधान परिषदेच्या जागेवर संधी देवून जनतेची सेवा करण्याची संधी द्यावी अशी मागणी आर्वी विधानसभ क्षेत्रातील नागरिकांची असुन येत्या हिवाळी अधिवेशनाच्यावेळी ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे यांना निवेदन सुध्दा देणार आहेत.
आर्वी विधानसभेची उमेदवारी मिळावी याकरीता सुधीर दिवे यांनी २०१४ मध्ये अथक परिश्रम केले. प्रत्येक समाजाचे मेळावे घेतले. भजन मंडळा पासुन तर महिला मंडळापर्यंत सर्वांचे मेळावे घेवुन भारतीय जनता पक्षाचे विचार घराघरापर्यंत पोहचवीण्याचा प्रयत्न केला मात्र पक्षाच्या धोरणामुळे आणी प्रस्थापीत नेत्याच्या हट्टापायी त्यांना उमेदवारी पासुन वंचीत राहावे लागले. २०१४ मध्ये त्यांच्या परिश्रमाचा लाभ माजी आमदार दादाराव केचे यांना मिळाला व त्यांचे मताधीक्य वाढले. तर दुसरीकडे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत सुध्दा त्यांनी घेतलेल्या परिश्रमामुळे सुमीत वानखेडे यांना प्रचंड मताधिक्याने विजय मिळवीता आला हे विसरता येणार नाही.
सुधीर दिवे यांचे राजकारण हे केवळ निवडणुकीपुरते मर्यादित नसून समाजकारणाला केंद्रस्थानी ठेवून चालते. नुकत्याच झालेल्या नागपूर लोकसभा निवडणुकीत नितीनजी गडकरी यांचा प्रचार यशस्वीपणे सांभाळून अभूतपूर्व विजय मिळवून देण्यातही दिवे साहेबांचा मोठा वाटा आहे.
त्यांच्यात केवळ राजकीय समजच नाही तर, समाजाच्या भल्यासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्वाची जोड आहे. त्यांनी विदर्भातील अमरावती, वर्धा, आणि नागपूर जिल्ह्यांमध्ये विविध सामाजिक आणि आर्थिक प्रकल्प राबवुन समाजाच्या सर्वांगीण विकासाला गती देण्याच काम केलं.
अमरावती येथील अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटलच्या माध्यमातून त्यांची सतत रुग्णसेवा सुरू असते तसेच वर्धा, अमरावती आणि नागपूर जिल्ह्यात मदर डेरी चे जाळे पसरवून त्यांनी हजारो शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये अमुलाग्र बदल घडविण्यासाठी प्रयत्न केले आहे. त्यांनी वर्धा जिल्ह्यामध्ये सुचारा फार्म प्रोड्यूसर कंपनीचे माध्यमातून चारा उत्पादक शेतकऱ्यांची एक वेगळी ओळख निर्माण करून दिली आहे. शोषित, पीडित, दलित आणि वंचित समाजासाठी अहोरात्र झटणारे नेते आहेत. ते राजकारणाला केवळ सत्ता प्राप्तीचे साधन मानत नाहि तर समाज उभारणीचे माध्यम मानतात. अशा सर्व द्ष्टिने विचार करणाऱ्या सुधीर दिवे यांना राज्याच्या वरिष्ठ सभागृहात प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळावी अशी मागणी आर्वी विधानसभा क्षेत्रातील नागरीकांची आहे.