Uncategorized

आंबेडकरी समाजाच्या आवाहनाला व्यापाऱ्यांचा चांगला प्रतीसाद, व्यापार पेठ १०० टक्के बंद

शहिद सोपान सुर्यवंशीला न्याय द्या, आरोपींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, निवेदन देवुन केली मागणी

आर्वी,दि.१६:- संविधानाच्या प्रतीकृतीची विंटबना करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा तसेच पोलीस कोठडीत शहिद झालेल्या सोपान सुर्यवंशी यांना न्याय द्या या मागणी करीता येथील आंबेडकरी समाजाच्यावतीने सोमवारी (ता.१६) व्यापार पेठ बंदचे आवाहन केले होते. याला येथील व्यापाऱ्यांनी आपली प्रतीष्ठाने स्वंयस्फुर्तीने बंद ठेवून चांगला प्रतीसाद दिला तर, उपविभागीय अधीकारी यांना मागणीचे निवेदन सुध्दा देण्यात आले आहे.

मंगळवारी (ता.१०) परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्र्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्या समोर असलेल्या भारतीय संविधानाच्या प्रतीकृतीची  तोडफोड करुन विटंबना केल्याने आंबेडकरी जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष पसरला आहे. अशातच या दुष्कृत्याचा निषेध करण्याकरीता आंदोलन करणाऱ्यांवर उलट प्रशासनाने गुन्हे दाखल करुन पोलीस कोठडीत ठेवले यातील सोपान सुर्यवंशी यांचा कोठडीतच मृत्यु झाला. याचे तिव्र पडसाद देश भरात उमटत आहे. त्याचे पडसाद आर्वीत सुध्दा उमटले असुन येथील आंबेडकरी समाजाने शुक्रवारी (ता.१३) निवेदन दिले होते. तर, सोमवारी (ता.१६) शहरातील व्यापार पेठ बंद ठेवण्याचे आवाहन केले होते. त्याला येथील व्यापाऱ्यांनी आपआपली प्रतीष्ठाणे बंद ठेवुन उत्कृष्ठ प्रतीसाद दिला.

तर, दुसरीकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पतळा निर्माण व देखरेख समितीच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करुन आंबेडकर नगरातून शेकडो आंबेडकरी समाजबांधवाच्या सहभागातुन मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा जनता नगर, गुरूनानक चौक, गांधी चौक होत छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहचला येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यता आले तर उपविभागीय अधीकारी यांना निवेदन यांना मागणीचे निवेदन सुध्दा दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button