आमदार सुमीत वानखेडे यांनी घेतला कारंजा तालुक्यातील विकास कामाचा आढावा
वैयक्तीक स्वार्थासाठी चुका केल्यास माफ करणार नाही अशी दिली तंबी

आर्वी,दि.२८:- प्रशासकीय कामाचा अनुभव असलेल्या आमदार सुमीत वानखेडे यांनी कारंजा तालुक्यातील विकास कामाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी प्रशासकीय कामात स्वार्थासाठी चुका केल्यास त्या माफ केल्या जाणार नाही, त्यांना पाठीशी घातल्या जाणार नाही अशी तंबी वजा सुचना अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिली. यामुळे प्रशासकीय कामाला गती येण्याचे चिन्ह दिसू लागले आहे.
आमदार सुमीत वानखेडे यांनी विकासाची गती वाढवीण्याकरीता शुक्रवारी (ता.२७) कारंजा येथील पंचायत समीतीच्या सभागृहात आढावा बैठक घेवून संपुर्ण माहिती घेवून सहा महिण्याचा आराखडा तयार करण्याच्या सुचना अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या.
यावेळी अधिकारी व कर्मचाऱ्यासोबत संवाद साधतांना त्यांनी, केंद्र व राज्य सरकारच्या विकासात्मक कामाच्या योजना धडाक्याने राबवून जनतेची सेवा करायची आहे असा इरादा व्यक्त केला. यात कोणतीही अडचण आल्यास मोबाईलवरुन सरळ संपर्क साधुन मला त्याची माहिती द्या त्या सोडवीण्याकरीता तातडीने प्रयत्न केल्या जाईल. जनहितार्थ् विकासात्मक कामाचे प्रस्ताव तयार करा त्यासाठी त्या त्या खात्याचे मंत्री असो अथवा सचीव असो त्यांच्या सोबत संपर्क साधुन पाठपुरावा करुन प्रस्ताव मंजूर करुन घेवुन असे अधिकाऱ्यांना आश्वासीत केले. प्रशासकीय कामात कोणत्याही अधिकारी अथवा कर्मचाऱ्याने कामचुकारपणा करु नये. प्रशासकीय काम करतांना चुका होतात मात्र त्या वैयक्तीक स्वार्था पोटी केल्या गेल्या तर चुक करणारा अधिकारी असो अथवा कर्मचारी कुणालाही पाठीशी घातल्या जाणार नाही अशी तंबी वजा सुचना या बैठकीच्या माध्यमातुन देण्यात आल्या.
तत्पुर्वी पाणी पुरवठा योजना, आरोग्य, शिक्षण, पशुसंवर्धन, रोजगार हमी योजना, घरकुल योजना आदिंची माहिती त्या त्या विभागाच्या अधिकाऱ्यांकडून घेवून काम करतांना येणाऱ्या अडचणी समजुन घेतल्या.
या बैठकीत गट विकास अधिकारी प्रवीण देशमूख, विस्तार अधिकारी, पंचायत अधिकारी व कर्मचारी उपस्थीत होते.